पालक खाऊन नाद्याबाद कामं करणारा पोपॉय खऱ्या आयुष्यात होऊन गेलाय
तुम्हाला महिताय का पोपॉय पोलंडचा होता. अगदी खराखुरा माणूस….
होय अहो आम्ही काय बी खोट सांगत नाही. तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारा पोपॉय खरोखर होता. आता कार्टून मध्ये जो पोपॉय आवडतो तो प्रत्यक्षात आवडला नसता ही गोष्ट बाजूला ठेवली तर तो एक अफलातून माणूस होता, आणि अफलातून अशा कार्टूनिस्टने त्याला कार्टून नेटवर्क वर आणला.
आज स्पिनॅच खाऊन ब्लुटोला ठोसे मारणाऱ्या पोपॉयची गोष्ट.
तर बेसिकली अस वाटत की एखाद्या कार्टूनचा शोध कसा लागतो तर कुणाच्या तरी कल्पनेतून. पण पोपॉयच तसं नव्हतं. तो प्रत्यक्षात एका वास्तविक व्यक्तीवर आधारित होता. आणि त्या व्यक्तीची वैशिष्ट्य पण अगदीच कार्टून कॅरेक्टर पोपॉय सारखीच होती.
पहिलं तर बघूया कोणी हे कॅरेक्टर तयार केलं
तर पोपॉय या कार्टून कॅरेक्टरच्या मागे असलेला माणूस होता,
एलझी क्रिसलर सेगर
हा एलझी न्यूयॉर्क टाइम्ससाठी काम करत होता. आणि एक प्रसिद्ध कार्टून डिझायनर सुद्धा होता. 1919 मध्ये, सेगरला न्यूयॉर्क टाईम्सने विचारलं की तू एखादं नवीन कार्टून कॅरेक्टर डेव्हलप करु शकशील का ? जे तरुण पिढ्यांपर्यंत पोहोचेल. सेगर हो म्हंटला.
मग आता कोणतं कॅरेक्टर तयार करायचं याचा विचार करत सेगर आपल्या गावी पोहोचला. तो अमेरिकेतील इलिनॉयमधील चेस्टर नावाच्या गावात राहायचा. त्याच्या गावात बरीच मनोरंजक व्यक्तिमत्त्व होती. या अजब गजब लोकांचा तो बऱ्याचदा आपल्या कार्टून मध्ये वापर करायचा.
जे. विल्यम शुचर्ट हे सेगरने तयार केलेल एक प्रसिद्ध पात्र होत. आणि ते चेस्टरमधील स्थानिक थिएटरच्या मालकावरुन प्रेरित झालेलं होत. पोपॉयच्या बाबतीतही सेम असंच घडलं.
पोपॉयच्या मागचं प्रेरणास्थान होतं
फ्रँक फिगेल
गावकरी त्याला रॉकी या टोपणनावने हाक मारायचे. या फ्रँकचा जन्म 1868 मध्ये झाला. तो लहान असतानाच आपल्या कुटुंबासोबत पोलंडहून अमेरिकेत स्थलांतरित झाला होता. त्याला असं वाटत राहायचं की आपण समुद्र सफर करीत संपूर्ण जग हिंडलं पाहिजे. पण आयुष्यभर त्याने काही खलाश म्हणून काम केलंच नाही. तो बारटेंडर म्हणून पण काम करू लागला.
तो एकदमच बोल्ड होता. बाकीच्या लोकांच्या तुलनेत चेहरा जरा वेगळाच होता त्याचा. त्याला मजबूत हनुवटी, जाड जाड हात होते आणि तो कायम सिगार ओढायचा. कपड्यांचं म्हणाल तर तो नेहमी पट्टेदार खलाशाचा टी-शर्ट आणि त्याची टोपी घालायचा.
त्याच्या तोंडात सिगारची नळी कधी दिसली नाही असं कधी झालंच नाही. त्याशिवाय तो घर सोडायचाच नाही. त्याच्या चेहऱ्याची नैसर्गिक विकृती म्हणजे त्याचा एक डोळा दुसऱ्यापेक्षा मोठा होता, त्यामुळे त्याला पॉप-आय हे टोपणनाव देखील मिळालं होतं. आणि इथूनच जन्म झाला होता, कार्टून नेटवर्क वर लागणाऱ्या
पोपॉय (पॉप आय) द सेलर मॅन चा…
हा पोपॉय अंगकाठीने बलदंड होता त्यामुळे बऱ्याचदा त्याला मारामारी करायला आवडत असे. पण तो तितकाच दयाळूपणा देखील होता. हीच वैशिष्टय़े पोपॉय या कार्टुन मध्ये तुम्हाला दिसतील.
चेस्टरमधील एका लोकल बारमध्ये हा पोपॉय सेगरला भेटला. त्या बार मध्ये पोपॉयच वागणं बघून सेगरला मनोमन कळलं की आपण शोधतोय ते कॅरेक्टर तर हेच आहे. ठरलं तर हाच आपला हिरो असं फ्रॅंकने मनोमन ठरवलं.
पोपॉय मनाने एवढा चांगला होता की, तो चेस्टरच्या आसपासच्या भागातल्या मुलांबरोबर खेळायचा त्यांना गोष्टी सांगायचा. या गोष्टीने सेगरला प्रेरणा दिली. जेव्हा हे कार्टून छापून आलं ना तेव्हा खरोखरच या कॅरेक्टरचा स्फोट झाला होता आणि अमेरिकेतील 500 वर्तमानपत्रांमध्ये तो छापून आला होता. 1930 मध्ये जगभरातील सर्वच लोकांचं लक्ष या कॅरेक्टरने वेधून घेतल होत.
सेगर 1938 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी मरण पावला आणि 1947 मध्ये तर फ्रँक फिगेल म्हणजे आपल्या पोपॉयचा मृत्यू झाला. पण 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस पोपॉयच ज्या प्रकारे चित्रण करण्यात आल होत ते नंतरच्या काळात अस्सल वाटलंच नाही. पोपॉय हा मूळतः “पोपॉय द कोस्ट गार्ड” म्हणून ओळखला जात होता. पण नंतर ज्यांनी पोपॉय कॅरेक्टर पुढं नेल त्यांनी आपल्या आपल्या कल्पना या पोपॉय मध्ये टाकल्या.
खरा पोपॉय कधी मरण पावला हे रेकॉर्डवर नाहीये पण अस मानल जात की दुसऱ्या महायुद्धात जर्मन नौदलाशी लढताना त्याच निधन झाल.
धाडशी होता राव आपला पोपॉय.
हे ही वाच भिडू
- अस्सल भारतीय मातीतलं कार्टुन यशस्वी होत नाही हा गैरसमज छोटा भीमने मोडला
- डिस्नेच्या स्टुडियोत उंदीर पळापळ करतांना पाहून त्याला मिकी माऊस सुचला.
- जपानी माणसाने रामायणावर बनवलेला अॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला नव्हता
The post पालक खाऊन नाद्याबाद कामं करणारा पोपॉय खऱ्या आयुष्यात होऊन गेलाय appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: