शेतकऱ्यांच्या घेरावातून सटकताच कंगनाने मारली पलटी; म्हणाली, ‘मी माफी मागितलीच नाही’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या कारला शुक्रवारी पंजाबमधील नाराज शेतकऱ्यांनी घेरले होते. कृषी कायद्याविरोधात शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा कंगनाने त्यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी तिची कार अडवून तिला जाब विचारला. त्यावेळी कंगना शेतकऱ्यांचा आक्रोष पाहून त्यांची माफी मागितली. मात्र, तिथून बाहेर पडताच कंगनाने फिरकी घेत तिने माफी मागितली नसल्याचे म्हटले आहे.
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना माफी मागण्याबाबत आपली बाजू मांडली आहे. तिने लिहिले की, ‘कोणीही मला माफी मागायला सांगितले नाही आणि मी कधीही माफी मागितली नाही. मी माफी का मागू? कशासाठी ? पंजाबमधील लोकांच्या या खऱ्या प्रेमासाठी आणि काळजीसाठी मी माफी मागू ? मी असे कधीच करणार नाही’.
तिने पुढे लिहिले की, ‘जमावातील त्या महिलेशी मी काय बोलले ते संपूर्ण संवाद माझ्या इन्स्टा स्टोरीतील व्हिडिओत आहे. तसेच सगळ्या माध्यमातही याबाबतच्या बातम्या आहेत. कृपया अफवा पसरवू नका. मी नेहमी शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळेच मी कृषी कायद्यासंदर्भात माझी बाजू मांडली आहे. तसेच यापुढेही मी माझी बाजू मांडत राहणार. जय हिंद’.
कंगना शुक्रवारी पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेरले होते. याबाबत कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली होती. ही घटना चंदीगड-उना महामार्गावरील बुंगा साहिब, किरतपूर साहिब येथे घडली होती. कंगनाने शेअर केलेला व्हिडिओ तिच्या गाडीच्या आतून शूट करण्यात आला होता. या व्हिडिओत वाहनाभोवती उभे असलेले शेतकरी मुर्दाबादच्या घोषणा देताना दिसत होते.
व्हिडिओत बोलताना कंगनाने सांगितले की, ‘मी हिमाचलमधून आली आहे. पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. हे लोक स्वतःला शेतकरी म्हणवून घेत आहेत आणि मला घाणेरडी शिवीगाळ करत आहेत. मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. शेतकरी आंदोलनावेळी केलेल्या वक्तव्यांवरून शेतकऱ्यांनी माफीचीही मागणी केल्याचे कंगनाने या व्हिडिओत म्हटले होते.
त्यानंतर कंगनाने इतर काही व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये एका व्हिडिओत ती महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसत होती. या व्हिडिओंमध्ये कंगना राणावत एका महिला शेतकऱ्याला तू माझ्या आईसारखी आहेस, असे सांगताना दिसत होती. महिलांशी संवाद साधल्यानंतर कंगनाने पोलिसांच्या मदतीने तेथून काढता पाय घेतला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर कंगनाने पंजाब पोलिसांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या :
तोंडावर ऍसिड फेकून पळून गेला होता प्रियकर, १९ वर्षांच्या कंगनाने बहिणीच्या केल्या होत्या ५३ शस्त्रक्रिया
रणबीरने आलिया भट्टच्या महागड्या लेहेंग्याला मारली लाथ, संतप्त युजर्स म्हणाले, त्याच्याशी लग्न करू नको; पहा व्हिडिओ
लेकरचा जीव वाचवण्यासाठी आई बिबट्याला भिडली, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलाचे प्राण
धक्कादायक! ‘ती’ लग्नाला नाही म्हणाली, चिडलेल्या नातेवाईकांनी केला सामूहीक बलात्कार
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: