आई गेल्याचा विरह सहन न झाल्याने , मुलाने उचलले टोकाचे पाऊल

December 13, 2021 , 0 Comments

आईचा विरह सहन न झाल्याने तरुणाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी ८.५० वाजता अंबाझरी तलावावर हा सर्व प्रकार घडला. तरुणाच्या आईचे नुकतेच निधन झाले होते हेच दुःख सहन होत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

अंबाझरी तलावात मृतदेह आढळून आल्याने पोलीस त्या ठिकाणी आधीच काम करत होते. तलावातून मृतदेह बाहेर काढला होता आणि पुढील कारवाई सुरु होती. इतक्यात पोलिसांना पंप हाऊसच्या बाजूला एका तरुणाने तलावात उडी घेतल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेच पोहणाऱ्याच्या मदतीने त्या युवकाला पाण्याबाहेर काढले.

अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागूल, निरीक्षक हरिदास मडावी, सहायक निरीक्षक आचल कपूर, अंमलदार प्रशांत गायधने यांनी त्या युवकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर विचारपूस केली. यावेळी हर्ष नामक तरुणाने आपली करून कहाणी पोलिसांना सांगितली. पोलिसांना देखील सर्वकाही ऐकून धक्का बसला.

नुकतंच हर्षच्या आईच अपघातात निधन झालं होत. आईने डोळ्यासमोर प्राण सोडल्याचा विरह हर्षला अजूनही सहन होत नव्हता. मनात चलबिचलता होती, वारंवार तेच आठवत असल्याने तो मनाने अस्थिर झाला होता. याचा करणामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

घडलेला सारा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हर्षच्या घरच्यांना फोन लावला. त्यानंतर हर्षचे वडील आणि मामा देखील तलावावर पोहचले. पोलिसांनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं तेव्हा तत्यांचाही यावर विश्वास बसत नव्हता.

अखेरीस हर्षला सुरखरूप पाहून त्यांना देखील बरे वाटले. यावेळी वडील व मामांनी अंबाझरी पोलिसांसह जलतरणपटू जांभूळकर यांचे आभार मानले. आईच्या विरहात खचलेल्या हर्षची समजूत घालत त्यांनीं घराच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली.

ताज्या बातम्या
महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच दिल्लीत.. भुजबळांच्या विधानाने चर्चांना उधाण
शरद पवार यांचे ह्रदय फक्त मराठ्यांसाठीच धडधडतंय, ओवैसींचा पवार यांच्यावर थेट निशाणा…
शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही आशावादी, पवारांसमोर खासदाराचे मोठे वक्तव्य
“26 खासदार असलेला गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा का होणार नाही?”

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: