महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच दिल्लीत.. भुजबळांच्या विधानाने चर्चांना उधाण

December 13, 2021 , 0 Comments

एककीडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन दिल्लीतील आपली स्पेस तयार करण्याचं काम सुरू केल आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. शरद पवारांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत भुजबळांनी पवारांच्या दिल्ली नेतृत्वाबाबत विधान केले आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होईल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देशाला तुमची गरज आहे पवार साहेब असा सूर लावताना दिसत आहेत.

काय म्हणालेत भुजबळ नेमकं
संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होईल.
त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

आजवर अनेक संकटांना पवारांनी तोंड दिले आहे. किती जरी मोठ संकट त्यांच्यासमोर आलं तरीदेखील पवारांचा संयम कधीही ढळणार नाही ही अतिशय विशेष बाब आहे. अशा शब्दात भुजबळांनी पवारांवर स्तुती सुमने उधळली.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. मात्र एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला. त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. अशी टीका भुजबळांनी विरोधकांवर केली.

आरक्षण काढून टाकण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न उधळून लावण्याची सर्व ओबीसीसह इतर नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेऊन त्यांना आपल्या दारात उभं करू नका, असे आवाहन भुजबळांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या
शरद पवार यांचे ह्रदय फक्त मराठ्यांसाठीच धडधडतंय, ओवैसींचा पवार यांच्यावर थेट निशाणा…
शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही आशावादी, पवारांसमोर खासदाराचे मोठे वक्तव्य
“26 खासदार असलेला गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा का होणार नाही?”
बापलेकीचे आगळेवेगळे प्रेम!! लग्नात दोन लाख खर्च करून लेकीने बनवला पित्याचा पुतळा, कारण..   

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: