शशिकांत शिंदे यांनी पराभवाचा बदला घेतलाच, शिवेंद्रराजेंना शह देत बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
सातारा । काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. यामध्ये अनेकांना मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत एका मताने पराभव झाला. तसेच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे हे बिनविरोध निवडणूक आले होते.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने नितीन जाधव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शह दिला आहे. बँकेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी शिवेंद्रराजेंनी फिल्डिंग लावली होती. त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
यामुळे अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता राष्ट्रवादीने आपल्याच पक्षातील व्यक्तीकडे अध्यक्षपद देणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावत जोरदार फटकेबाजी केली आहे.
यामुळे याची जिल्ह्यात चर्चा आहे. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. जिल्हा बँकेत नेहमीच पक्षविरहीत कामकाज चालते. दिवंगत लक्षमणतात्या पाटील यांनी कायम पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती.
त्यामुळे त्यांच्या मुलाला अध्यक्ष केले. याचा आम्हाला आनंदच आहे. यामुळे कार्यकर्त्यांनाही समाधान झाले, माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच भावना ओळखून पवारसाहेबांनी नितीन पाटील यांना अध्यक्ष केले.
याआधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते, तेव्हाही पवार साहेबांकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली आणि त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असेही ते म्हणाले. यामुळे आता शिवेंद्रसिंहराजे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: