“भाजपची भाषणे चला हवा येऊ द्या पेक्षा कमी नसतात, लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढंच त्यांना वाटतं”
अहमदनगर जिल्ह्यातील चार पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगरपंचायतीचाही समावेश केला गेला आहे. पण या निवडणूकीसाठी राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे.
आता निवडूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच या शक्ती प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यावेळी बोलताना रोहित पवारांनी भाजप नेते राम शिंदेंवर निशाणा साधला आहे.
भाजपची सोमवारची सभा सर्वांनी पाहिली, आम्हालाही आश्चर्य वाटले. काल सभा आम्ही घेणार होतो, पण कर्जतमध्ये बाजार असल्याने सभा घेतली नाही. बाजाराच्या दिवशी सभा घेतली तर व्यापाऱ्यांचा दिवस जातो. ग्रामीण भागातून आलेले ग्राहक, शेतकरी, मजूरांना अडचणी येतील हा विचार आम्ही केला होता, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
भाजपचा उमेदवार व नेता पाहून लोकांची गर्दी होईल अथवा नाही, याची त्यांना शंका होती. त्यामुळे त्यांनी बाजाराच्या दिवशीच सभा घेतली, असा टोला नाव न घेता रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना लगावला आहे.
निवडणूकीच्या पहिल्याच दिवशी नगरपंचायत हारण्याची भिती त्यांनी मनामध्ये बाळगली. सोमवारच्या सभेतील त्यांची भाषणे ऐकली तर हवा येऊ द्या कार्यक्रमापेक्षा कमी नव्हती. पुढे बसलेल्या लोकांना टाळ्या वाजवायला मजा करायला भेटले म्हणजे त्यांचे झाले. त्या लेव्हलला आपण जाणार नाही. दुसऱ्यांची चेष्टा करुन विकासबाबत कोणी बोलत नसेल तर त्यातून काही मिळणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आपल्याला विकास पाहिजे असतो, पण विकास काय आहे हे त्यांना कसं कळणार? त्यांनी आतापर्यंत गटातटाचे राजकारण केले आहे. याला फुगवायचं, त्याला फुगवायचं मग दोन्हींना आपणच पेटवायचं, असे राजकारण आपल्याकडे होणार नाही. लोकांनी आमदार म्हणून निवडणून दिले. लोकांच्या हितासाठी काम करत राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कर्जतमध्ये इमारतींची स्थिती अशी धोकादायक आहे की आज पडते की उद्या असे वाटते. कर्जतमधील सर्व प्रशासकीय कार्यलय एका इमारतीखाली आणली, कामे होणार आहेत. हे पाहून इमारत लोक २ किलोमीटर लांब नेली अशी टीका करतात. पण इमारत जूनी होती, तुम्ही मंत्री होते तेव्हा झोपले होते काय? असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.
तुम्ही स्वराज्य ध्वजाबद्दल बोलतात, परत पातळी खाली घेतली तर लोकशाही आणि जनतेच्या माध्यमातून दाखवून देईन. फक्त दोन वर्षांत तुमची ही परिस्थिती झाली आहे. पुढील दहा वर्षांत तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही, अशी जहरी टीका रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! फुग्यासारखी फुगली तरुणाची पाठ; डॉक्टरने शेअर केला भयानक व्हिडिओ
रावत सरकारला घाबरत नव्हते त्यामुळे…; बिपीन रावत यांच्या अपघातावर भाजप नेत्यानेच व्यक्त केला संशय
राष्ट्रवादी काॅंग्रेसने सामान्य रिक्षाचालकाला केले दौंडचे उपनगराध्यक्ष; रिक्षाचालक म्हणतो..
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: