चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमी चालणारी भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; फक्त ४९९ रुपयांमध्ये करा बूक

December 05, 2021 , 0 Comments

भारतीय बाजारात आता नवनवीन इलेक्ट्रिक कार्स आणि स्कूटर्स लाँच होत आहे. अशात ईव्ही स्टार्टअपमध्ये बाउंस Infinity हे भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांमध्ये सामील होणारे सर्वात नवीन EV स्टार्टअप बनले आहे.

बाउंसने गुरुवारी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, बाउंस इन्फिनिटी लाँच केली. बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये आहे ज्यामध्ये बॅटरी आणि चार्जरचा समावेश आहे. बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वात खास बनवते ती म्हणजे बॅटरीशिवाय त्याची किंमत ३६,००० रुपये आहे. विशेष म्हणजे ग्राहक ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ४९९ रुपयांमध्ये बूक करु शकतात.

बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेतील Ola S1, Bajaj Chetak Electric, TVS iQube आणि Ather 450X सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करणार आहे. बाऊन्स इन्फिनिटी डिसेंबरच्या मध्यापासून टेस्ट राइडसाठी उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी मार्च २०२२ मध्ये सुरू होईल.

नवीन इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर ही पर्यायी बॅटरीसह सादर केलेली बाजारपेठेतील पहिली स्कूटर आहे. बाउन्सने इन्फिनिटी स्कूटरसह बॅटरी लाँच केली आहे. याद्वारे ग्राहकांना बॅटरीशिवाय बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे.

बॅटरी एक सेवा म्हणून, बाऊन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर वापरकर्ते ऑपरेशनल कॉस्ट कमी करून बॅटरी चार्जिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यास सक्षम असतील. ते स्कूटरची बॅटरी बदलून थेट प्रवास करू शकतात म्हणजेच स्कूटरमध्ये पूर्ण चार्ज झालेली बॅटरी टाकून ते प्रवास करु शकतात.

बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरला 39AH सह वॉटरप्रूफ IP67 रेटेड 48V लिथियम-आयन बॅटरी मिळते. बाउन्स इन्फिनिटी ८ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. या ई-स्कूटरचा टॉप स्पीड ६५ किमी प्रतितास आहे. ही स्कूटर एका पूर्ण चार्जवर ८५ किलोमीटर चालू शकते.

या स्कूटरला ड्रॅग मोड मिळतो जो वापरकर्त्यांना टायर पंक्चर झाल्यास स्कूटर ड्रॅग करण्यास सक्षम करतो. यासोबतच स्कूटरमध्ये पॉवर आणि इको ड्रायव्हिंग मोडही उपलब्ध आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये संपूर्ण डिजिटल स्पीडोमीटर उपलब्ध आहे. जे इग्निशन स्टेटस, साइड स्टँड स्टेटस, इंडिकेटर, बॅटरी SOC स्टेटस, स्पीड डिस्प्ले, ओडोमीटर रीडिंग, वाहन स्टेटस, ब्लूटूथ स्टेटस, हाय बीम स्टेटस यासारखी माहिती दाखवते.

ही स्कूटर स्मार्ट अॅपने जोडली जाऊ शकते. यामुळे स्कूटरशी संबंधित माहिती मिळते. तसेच युजरच्या स्मार्टफोनवरून अनेक फीचर्स नियंत्रित करता येतात. इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्पोर्टी रेड, स्पार्कल ब्लॅक, पर्ल व्हाइट, डॅसेट सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे या रंगांचा समावेश आहे. कंपनी यासोबत तीन वर्षांची वॉरंटी देत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चक्क चेतेश्वर पुजाराने मारला षटकार; न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात भीमपराक्रम
प्रायव्हेट पार्टमध्ये बॉम्ब अडकला म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला, सगळं पाहून डॉक्टरांना देखील आली चक्कर
अजब-गजब! प्रियकरासाठी नवऱ्याचे लग्न बहिणीसोबत लावून दिले, प्रियकर पळून गेल्यावर नवरा मागितला परत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: