युपीएससीत १९ वा आल्याचा संबित पात्रांचा दावा निघाला खोटा; सत्य समोर आल्यावर लोकांनी झाप झाप झापले

December 06, 2021 , 0 Comments

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आजतकच्या ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात दिलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक, या कार्यक्रमात आपण एमबीबीएस केले आहे, एमएस केले आहे. लंडनमधून एमआरसीएस केले, आणि 2000 मध्ये युपीएससी परीक्षेत 19 वा क्रमांक मिळवला आहे, अस म्हटलं होतं, काहींनी त्यांच्यावर चुकीची माहीती दिल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर घेरल्यानंतर खुद्द संबित पात्रा यांनीही या दाव्यावर खुलासा केला आहे. काँग्रेस नेते आदित्य गोस्वामी यांनी संबित पात्रा यांच्यावर खोटे बोलत असल्याचा व्हिडीओ शेअर केला, तसेच 2000 च्या परीक्षेतील रँकधारकांची यादीही शेअर केली. आदित्य गोस्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, आहे की “काल भाजप नेते संबित पात्रा यांनी आजतकच्या मंचावर खोटे बोलले.

संबित पात्रा यांनी 2000 साली आपण यूपीएससी परीक्षेत 19 वा क्रमांक मिळवला होता अस म्हटल होत. आदित्य गोस्वामी यांनी ट्विटमध्ये संबित पात्राची खिल्ली उडवत पुढे लिहिले की, “हे आज अगदी सहजपणे सिद्ध केले जाऊ शकते. 2000 मध्ये, संबित नावाच्या कोणत्याही व्यक्तीने यूपीएससी परीक्षेत रँक मिळवला नाही.”

लेखक देवदत्त पटनायक यांनी संबित पात्रा यांच्या व्हिडिओची खिल्ली उडवली आणि लिहिले, “कदाचित आपण ‘संपूर्ण’ यूपीएससीबद्दल बोलत आहोत? आयुष्मान सेलने संबित पात्रावर कारवाईची मागणी केली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी थेट चर्चेत दावा केला की त्यांनी 2000 च्या यूपीएससी परीक्षेत 19 वा क्रमांक मिळवला होता. वस्तुस्थिती अशी आहे की त्या वर्षी संबित नावाचा कोणीही परीक्षा उत्तीर्ण झाला नाही. लाइव्ह टीव्हीवर खोटे दावे केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.”

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संबित पात्रा यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आणि लिहिले, “काय आश्चर्य आहे?” काँग्रेस नेते विनय कुमार डोकनिया यांनी लिहिले. संबित पात्रा मी 2000 मध्ये युपीएससी परीक्षेत 19 वा क्रमांक मिळवला होता. काही लोकांनी संबित पात्रा यांच्या वक्तव्याचे समर्थनही केले. संबित पात्रा यांच्या दाव्याचे समर्थन करताना, अजय चौधरी नावाच्या व्यक्तीने लिहिले की, त्यानी युपीएससी ची संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा पास केली होती.

दुसरीकडे, संबित पात्रा यांनी अजेंडा आजतकमध्ये केलेल्या दाव्याचा बचाव करत ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, सीएसई व्यतिरिक्त, युपीएससी देखील सीएमएस ची परीक्षा घेते. मला असे वाटायचे की ‘सुशिक्षित’ लोकांना हे कळेल, परंतु असे दिसते की काहीजण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात.”
महत्वाच्या बातम्या
अर्जून-मलायकाचा स्विमींगपूलमधील बोल्ड व्हिडीओ व्हायरल; अर्जूनने मलायकाला मागून दिला जोराचा धक्का
अजबच! ब्रिगेडने कुबेरांवर केलेल्या शाईहल्ल्याचा पवारांकडून निषेध; तर भाजपच्या दरेकरांकडून समर्थन
पुजाराने षटकार मारल्यानंतर अश्विनला अर्धी मिशी काढून गोलंदाजी करावी लागणार; वाचा पुर्ण किस्सा
युपीच्या निवडणूकीत ‘या’ पक्षाचा करणार प्रचार; कंगणाने केली घोषणा पण भाजपचे नावही घेतले नाही


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: