राजे तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे..कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने लिहिले उदयनराजेंना पत्र

December 05, 2021 , 0 Comments

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या हटके स्टाईलमुळे राज्यभर त्यांचे असंख्य चाहते आहेत.उदयनराजेंना अनेक तरुण फाॅलो करतात. उदयनराजे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राजेंची भाषण शैली आजच्या तरुणाईला चांगलीच आवडत आहे. म्हणूनच त्यांचे फॅन्स दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत.

राजे तुम्हला घट्ट मिठी मारायची आहे, तुम्ही मारलेल्या मिठीतून शंभर वाघांची ताकद आम्हला मिळते असं म्हणत उदयनराजेंना एका कार्यकर्त्याने पत्र लिहिले आहे. किंग ऑफ मिलियन हार्ट,उदयन राजे असं म्हणत नांदेड शहरातील एका तरुणाने खासदार उदयनराजे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतंय.

नांदेड शहरातील विजय टर्के असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे विजय ने हे पत्र खासदार उदयनराजे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलं. विजय उदयनमहाराजांचा मोठा चाहता आहे. म्हणूनच त्याने स्वतःच्या रक्ताने महाराजांना पत्र लिहिल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय लिहिलंय पत्रात
आमचे श्रद्धास्थान
फक्त छत्रपती

मुजरा राजं
महाराज साहेब आपण आमच्या समोर असताना काय बोलावे काहीच सुचत नाही. पण तुमच्याकडे सारखे बघतच राहावं असं मनाला वाटते, महाराज साहेब एकवेळेस आपल्याला घट्ट मिठी मारायची आहे, तुम्ही मारलेल्या त्या मिठीतुन १०० वाघांची ताकद अंगी येते. महाराज साहेब अखंड हिंदुस्थान तुमच्यावर जीव ओवाळून टाकतो, महाराज आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि शेवटपर्यंत कधीही आपली साथ सोडणार नाही, हा शब्द आहे आमचा म्हणून स्वतःच्या रक्तानी पत्र लिहिले आहे, महाराज साहेब. जय जिजाऊ, जय शिवराय, जय उदयनराजे

रयतेचे राजे उदयनराजे
मावळ्यांचे प्रेम उदयनराजे
शत्रूची धडकी उदयनराजे
दीन दुबळ्यांचे कैवारी उदयनराजे
गोर गरिबांचे पाठीराखे उदयनराजे
सातारा राजधानीचे परमनंट खासदार उदयनराजे

अवघा महाराष्ट्र गरजे
उदयनराजे…उदयनराजे…उदयनराजे
King of millions hert’s
महाराज साहेब..

आपलाच मावळा
विजय पाटील, टर्के,नांदेड

विजयने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतय. उदयनराजेंनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या पत्राची जोरदार चर्चा आहे.
ताज्या बातम्या
१६ करोडमध्ये रिटेन होऊनही दु:खात आहे रोहित शर्मा, म्हणाला, ‘या’ गोष्टीने माझे ह्रदय पुर्णपणे तुटले
“ज्यांना काॅंग्रेसकडून आयुष्यभर सुख आणि सत्ता मिळाली तेच लोकं काॅंग्रेसची गळचेपी करताहेत”
मुख्यमंत्र्यांनी भाजप महिला आमदाराच्या प्रश्नाची उडवली खिल्ली; म्हणाले, तुम्ही दिसायला सुंदर आहात पण…
कामगाराने एका हाताने फेकले शेकडो किलोचं पोतं; लोकं म्हणाले, बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: