सारेगमप लिटिल चॅम्पसच्या महाअंतिम सोहळ्यात ‘ही’ स्पर्धक ठरली विजेती
झी मराठी वाहिनीवरील सांगितिक रिअॅलिटी शो सारेगमप लिटील चॅम्पसचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. संगीतसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा रंगतदार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांपैकी मुंबईची गौरी गोसावी अव्वल स्थान पटकावत विजेतेपद आपल्या नावे कोरले.
सारेगमप लिटिल चॅम्पसच्या यंदाच्या पर्वात स्वरा जोशी, सारंग भालके, गौरी गोसावी, पलाक्षी दीक्षित आणि ओमकार कानिटकर हे पाच स्पर्धक टॉप पाचमध्ये पोहोचले होते. महाअंतिम सोहळ्यात या सर्व स्पर्धकांनी एकाहून एक गाणी सादर केली. तर अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीने विजेतेपद आपल्या नावे केले.
यावेळी गौरीला पारितोषक म्हणून १ लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट देण्यात आली. तर उपविजेते ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालके यांनी ७५ हजार रूपयांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट देण्यात आली.
झी मराठी वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या काळात प्रसारित झालेल्या सारेगमप लिटिल चॅम्पस या शोने खूप लोकप्रियता मिळवली होती. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेला सांगितिक रिअॅलिटी शो ठरला होता. आपल्या मधुर आवाज आणि गायन कौशल्याद्वारे शोमधील प्रत्येक बालस्पर्धकाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
या सर्वांमध्ये प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड आणि आर्या आंबेकर हे टॉप ५ मध्ये पोहोचले होते. तर कार्तिकी गायकवाडने या शोचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर हेच पंचरत्न यंदाच्या पर्वात परिक्षकाच्या भूमिकेत होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बँकेसाठी इच्छुक असलेल्यांना अजितदादांचा दम, म्हणाले ना स्वत:ला कर्ज मिळेल, ना नातेवाईकाला
… म्हणून पांडू चित्रपटातील कलाकारांवर गुन्हे दाखल करा; आरपीआयची मागणी
सलमानला सोडून बॉडीगार्ड शेराला कतरिना-विकीच्या लग्नाचे आमंत्रण, मिळाली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाला कोर्टाची स्थगिती, राज्य सरकारला मोठा झटका
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: