मुख्यमंत्र्यांनी भाजप महिला आमदाराच्या प्रश्नाची उडवली खिल्ली; म्हणाले, तुम्ही दिसायला सुंदर आहात पण…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीदरम्यान भाजपच्या महिला आमदाराला संबोधित करताना तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, असे म्हटले होते. नितीश कुमारांच्या या वक्तव्याने अस्वस्थ झालेल्या महिला आमदाराने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली.
२९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यामध्ये भाजप, जेडीयू, व्हीआयपी पक्षाचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी विविध मुद्दे मांडले.
यादरम्यान, बिहारच्या एकमेव आदिवासी राखीव जागेवरील भाजप आमदार निक्की हेमब्रम यांनी आपल्या विधानसभेचा मुद्दा उपस्थित केला आणि आदिवासींना महुआ गोळा आणि साठवण्याची परवानगी देण्याची मागणी केली. जेणेकरून ते उपजीविका करू शकतील.
भाजप आमदाराच्या या मागणीवर नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात पण तुमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. अनुसूचित जमातींसाठी आम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जाऊ नका. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्याने उपस्थित सर्वजण हसू लागले तर भाजप आमदार निक्की हेमब्रम खूपच अस्वस्थ झाल्या.
द टेलिग्राफशी बोलताना भाजप आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिक्रियेने त्यांना धक्का बसला आणि त्यांना पुन्हा सावरण्यासाठी काही मिनिटे लागली. मला फक्त आदिवासींच्या उदरनिर्वाहाची काळजी वाटत होती आणि महुआ साठवून ठेवण्याची परवानगी मागितली होती.
तसेच महुआ हा त्याच्या उपजीविकेचा भाग असला तरी त्याचे संकलन आणि साठवणूक करण्यावर सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. पण मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या वक्तव्यामुळे मी खूपच अस्वस्थ झाले आहे. कदाचित त्यांना माझी माझ्या मतदार संघातील लोकांबद्दल वाटणारी काळजी समजली नसेल, पण त्यांनी वापरलेले शब्द एका स्त्रीला संभ्रमात पाडणारे आहे, असे निक्की हेमब्रम यांनी म्हटले आहे.
आम्ही त्यांना राज्याचे प्रमुख आणि आश्रयदाता मानतो पण त्यांचा मुद्दा योग्य नव्हता. त्यांनी मला चेष्टेचा आणि उपहासाचा विषय बनवले. लोक माझ्यावर हसत होते. हे माणसाचे जग आहे. स्त्रीने नेहमीच तिची प्रतिष्ठा आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे निक्की हेमब्रम म्हणाल्या आहे.
नितीश कुमार यांच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या भाजप आमदार निक्की हेमब्रम यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आणि त्यांच्याकडून कारवाईची मागणी केली. हेमब्रम म्हणाले की त्यांनी हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर सोडले आहे आणि त्यांच्याकडून काय कारवाई केली जाईल याची मी अपेक्षा करत आहे. भाजप नेत्यांनी कारवाई केल्यानंतरच ती याप्रकरणी पुढील पाऊल टाकेल.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चक्क चेतेश्वर पुजाराने मारला षटकार; न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात भीमपराक्रम
प्रायव्हेट पार्टमध्ये बॉम्ब अडकला म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला, सगळं पाहून डॉक्टरांना देखील आली चक्कर
अजब-गजब! प्रियकरासाठी नवऱ्याचे लग्न बहिणीसोबत लावून दिले, प्रियकर पळून गेल्यावर नवरा मागितला परत
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: