बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमधील वाद होणार कमी ! Whatsapp घेऊन येतंय धमाकेदार नवीन फिचर

November 26, 2021 , 0 Comments

आजच्या सोशल मीडियाच्या जगात व्हॉट्सअॅप ही सर्वांचीच गरज बनले आहे. एका सर्व्हेनुसार जगातील अर्ध्याहून लोकसंख्येपेक्षा अधिक लोक सध्या व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. व्हॉट्सअॅप देखील आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन नवं नवीन बदल करून अनेक वेगवेगळ्या सुविधा आपल्या युजर्सना देण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हॉट्सअॅप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी नवीन फीचर्स जारी करत असते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप डिलीट फॉर एव्हरीवन या फीचरचे टाइम लिमिट वाढवणार आहे.

सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज १ तास, ८ मिनिटे आणि १६ सेकंदात डिलीट केले जाऊ शकतात. माहितीनुसार, कंपनी ही वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे. अनेकांनी याबाबत व्हॉट्सअॅपकडे तशी मागणी देखील केल्याचे आता समोर आले आहे. व्हॉट्सअॅप हे प्रत्येकाच्याच गरजेचे साधन आहे म्हणूनच अनेकांना त्यांच्या सोयीनुसार त्यामध्ये बदल अपेक्षित असतात.

हे फिचर सध्या केवळ दुरुस्ती वर्कींगच्या टप्प्यात आहे. आत्तापर्यंत हे वैशिष्ट्य बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध करून दिलेले नाही. यापूर्वी व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याचे फिचर काढून टाकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र आता त्यामध्ये दुरुस्ती सुरु असल्याचे समजते.

WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp Desktop beta २.२१४७.४ मध्ये मेसेज डिलीट करण्याचे फीचर स्पॉट झाले आहे. या बीटा अपडेटनुसार, कंपनी वेळ मर्यादा ७ दिवस आणि ८ मिनिटांपर्यंत वाढवू शकते. त्यामुळे युजर्सना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे एन्गेज असणाऱ्या तरुण तरुणींना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये होणारे वाद यामुळे होणार नाहीत कारण आता जुने मेसेज देखील डिलीट करता येतील.

मात्र, व्हॉट्सअॅपचे हे फिचर डेव्हलपमेंट स्टेजवर असल्याने त्यात बदलही करता येऊ शकतात, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या फीचरबाबत कंपनीचे अधिकृत स्टेटमेंट येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही.मात्र या फीचरचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी सध्या ही फार मोठी आनंदाची गोष्ट नाही.

ताज्या बातम्या
शिवसेना आमदाराचा माणूसकीचा झरा! मध्यरात्री अपघातग्रस्तावर स्वत: केले उपचार
कॅज्युअल सेक्स, वन नाईट स्टँड यात चुकीचं काय? मी हे सर्व अनुभवलंय, अभिनेत्याच्या मुलाचा खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांनी राजीनामा देणार? आघाडीच्या बड्या नेत्याने केला खुलासा
इन्कम टॅक्सच्या रडारवर गृहमंत्री? वळसे पाटलांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या आॅफीस व घरावर छापे   

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: