Sachin Vaze Withdrew His Petition: सचिन वाझेची 'ती' याचिका मागे; घरातच नजरकैदेत ठेवण्याची याचिकेत होती विनंती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अँटिलिया विस्फोटके दहशत व व्यावसायिक मनसुख हिरन यांची हत्या या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली. 'माझ्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याने तूर्तास मला तळोजा तुरुंगात ठेवण्याऐवजी माझ्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश द्यावेत', अशी विनंती वाझेने अॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत या याचिकेद्वारे केली होती. (suspended police officer on thursday withdrew his petition in the mumbai high court) ही याचिका शस्त्रक्रिया झाल्यानंतर वाझेतर्फे लगेचच करण्यात आली होती. 'तुरुंगात जंतुसंसर्ग होण्याचा धोका आहे आणि शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीची अधिक काळजी घेणे आवश्यक असताना नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ते शक्य होणार नाही. त्यामुळे कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात जसे आरोपी वरवरा राव यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच माझ्याविषयी द्यावेत', असे म्हणणे वाझेने याचिकेत मांडले होते. क्लिक करा आणि वाचा- तर 'शस्त्रक्रियेनंतर योग्य ती काळजी व आवश्यक वैद्यकीय उपचार तळोजा तुरुंगातील रुग्णालयात होऊ शकतात. शिवाय आवश्यकता भासल्यास वाझेला सरकारी जेजे रुग्णालयातही नेले जाऊ शकते. त्यामुळे वाझेची विनंती फेटाळावी', असे म्हणणे एनआयने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडले होते. क्लिक करा आणि वाचा- तसेच ज्या कालावधीत हा तात्पुरता दिलासा आवश्यक होता तो कालावधीही निघून गेला. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी हा विषय न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आला असता, रौनक यांनी याचिका मागे घेण्याची अनुमती मागितली. त्यानुसार खंडपीठाने अनुमती दिली. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: