district bank election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केला 'हा' दावा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून चार पैकी तीन जागांवर काँग्रेसचा विजय झाला. मागीलवेळी बँकेत एकच संचालक होता, आता तीन झाल्याने काँग्रेसची ताकद वाढली असल्याचा दावा आज काँग्रेसचे यांनी पत्रकार परिषदेत केला. (district president pradip pawar has said that the strength of has increased after the jalgaon district bank elections) जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी २० जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. त्यात काँग्रेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेस भवनात जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, जनाबाई महाजन आद उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगितले की, पक्षाच्यावतीने चार जागा मागण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय खेळी झाल्याने चोपड्याची जागा लढवता आली नाही. परंतु तीनही जागांवर पक्षाने विजय संपादन केला. पुर्वी एकच जागा होती, आता तीन संचालक झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. हा काँग्रेसच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगीतले. दरम्यान, पक्षाच्या विरोधात जावून काम करणाऱ्यांवर कारवाईसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचेही पवार म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- गनिमी काव्याने मिळाला विजय- महाजन महाविकास आघाडीच्या रावेर येथील उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. पक्षाने उमेदवारी दिलेली असताना त्यांनी माघार न घेतल्यामुळे जाहीर माघारीची घोषणा केली. यादरम्यान पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भुमीका बजावली जात असल्याने गनिमी काव्याने निवडणूक लढवत विजय संपादन केल्याचे त्यांनी सांगीतले. आघाडीतर्फे ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करण्याचे ठरले परंतु ऐनवेळी अरूण पाटील भाजपला जाऊन मिळाल्यानेही ही खेळी केल्याचे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: