coronavirus latest updates करोना: राज्यात आज दैनंदिन मृत्यू वाढले; नवे रुग्ण मात्र घटले

November 26, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात आज गुरुवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसख्येत घट झाली असली तरी आज मृत्युसंख्येत वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात आज ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९७४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ८४८ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, राज्यात आज ९ हजार ३६६ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (maharashtra registered 848 new cases in a day with 974 patients recovered and 50 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ७९ हजार ३९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५० लाख ४७ हजार ४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३३ हजार १०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ९० हजार ५३८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ०६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ८५७ इतकी आहे. मुंबईत आज १७४ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज गुरुवारी १७४ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६२ हजार ०९५ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३१९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ११५ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज बुधवारी नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १४, ठाणे महापालिका क्षेत्रात ४१, कल्याण-डोंबिवलीत २३, नवी मुंबईत २०, मिरा-भाईंदरमध्ये १४, उल्हासनगरमध्ये १, भिवंडी निजामपूरमध्ये १ रुग्ण आढळले. तर, उल्हासनगरमध्ये १ रुग्ण आढळला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: