शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचे CCTV फुटेज व्हायरल, 25 कोटीच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा

November 05, 2021 , 0 Comments

मुंबई | आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. तरीसुद्धा या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज पुजा ददलानीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटी रुपायांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला मोठं यश आले आहे. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे या प्रकरणात खंडणीचा गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलने उघड केलेल्या माहितीला कुठेतरी दुजोरा मिळताना दिसत आहे.

आता मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी मुंबईतील लोअर परळ याच भागात २५ कोटी रुपयांचं डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला होता. आता याप्रकरणात एक धक्कादायक फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.

या फुटेजमध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडिज कार दिसून आली आहे. मुंबई पोलीस आता या पुराव्याच्या जोरावर पुजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. मुंबईतील क्रूझ पार्टीवरील ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यानं पुढे येत एनसीबी, किरण गोसावीवर खळबळजनक आरोप केले होते.

यामध्ये प्रभाकर साईल याने आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील केली होती. यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत असं किरण गोसावी सॅम डिसोजा याला सांगत असल्याचं आपण ऐकलं होतं, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल यानं केला होता. पोलिसांनी याप्रकरणात चौकशीला सुरुवात केली असता लोअर परळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.

आर्यन खान याला 3 ऑक्टोबरला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आर्यनची जामिनावर सुटका 30 ऑक्टोबरला करण्यात आली. पण या प्रकरणात अजून ही गौप्यस्फोट होत आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: