डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी; युवा शेतकऱ्यानं उचललं टोकाचे पाऊल
अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी या गावातील एका युवा शेतकऱ्याने (३२) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण बाबूलाल पोळकट असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जाला कंटाळून त्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी युवा शेतकऱ्याने एक व्हिडिओ काढला होता. या व्हिडिओत त्याने या आत्महत्येला महिंद्रा कोटक कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. तसंच, सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो आहे म्हणून मी आत्महत्या करीत आहे, असंही या व्हिडिओत नमूद केलं आहे. या, घटनेनंतर साखरी या गावात एकच खळबळ उडाली आहे. वाचाः साखरी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट (वय ३२) यांच्याकडे वडिलांच्या नावाने फक्त तीन एकर कोरडवाहू शेती आहे. शेती पिकत नसल्याकारणाने वारंवार कर्ज काढून शेतीला लावायचा मात्र शेतात पिकच येत नसल्यानं ते कर्ज वाढतं गेलं. या तीन एक्कर शेतीवर को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज आणि त्यासोबतच महिंद्रा कोटकचेही कर्ज आहे. या शेतकऱ्यानं एक छोटा ट्रॅक्टरही घेतला होता. मात्र, छोटा ट्रॅक्टर हा फायनान्स कंपनीचे अधिकारी घेऊन गेले. त्यामुळे प्रवीणची मानसिकरित्या खचला होता. या सर्व गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि सततच्या अडचणींमुळं तो अधिकत व्यथित झाला होता. या सर्व अडचणीमुळे त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या प्रविणच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग आहे. आई सतत आजारी असते. अशा परिस्थितीत अनेक अडचणींन तोंड देत तो पत्नी, दोन मुलं आणि आई, बाबांचा तो सांभाळ करायचा. आई-वडिलांना प्रवीण हा एकुलता एक मुलगा होता. म्हाताऱ्या आई वडिलांचा प्रवीण हाच एक आधार होता. मात्र, प्रवीणच्या आत्महत्येनंतर या कटुंबावर दुखाचा डोंगरच कोसळला आहे. वाचाः बँकेचे कर्ज आणि महिंद्रा कोटक या कंपनीकडून वारंवार होणारा वसुलीचा त्रास यामुळं आत्महत्या करत असल्याचं प्रवीणनं त्याच्या व्हिडिओत म्हटलं आहे. तसंच, माझ्या आत्महत्येला महिंद्रा कोटकचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.तसंच, त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असंही त्यानं व्हिडिओत म्हटलं आहे. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: