स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श केला तरी तो लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि पॉक्सो कायद्याबाबत मोठा निर्णय दिला असून, लैंगिक छळाच्या प्रकरणात स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट न करता कोर्टाने आरोपीला शिक्षा देण्यात येईल असे आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात POCSO कायदा देखील लागू होणार आहे.
खरेतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लैंगिक छळाच्या एका आरोपीला असे म्हणत निर्दोष मुक्त केले होते की, अल्पवयीन पीडितेला त्वचेच्या संपर्काशिवाय खाजगी अवयवाला हात लावणे POCSO कायद्यांतर्गत येत नाही. त्यानंतर हा मुद्दा अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलत सर्वोच्च न्यायालयाने आता हा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, लैंगिक हेतूने कपड्यावरुन स्तनांना स्पर्श करणे हा POCSO कायद्याचा विषय आहे. कपड्यांवरून मुलीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही असे म्हणता येणार नाही. अशी व्याख्या POCSO कायद्याने मुलींचे शोषणापासून संरक्षण करण्यासाठी केली आहे
दरम्यान, न्यायालयाने दोषीला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, सर्वोच्च न्यायालयाने त्या आरोपीला प्रकरणात दोषी ठरवले, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. आरोपीला पॉक्सो कायद्यान्वये ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कोर्टाने आपल्या निर्णयात POCSO कायद्याची व्याख्या करताना म्हटले आहे की लैंगिक हेतूने कपड्याला स्पर्श करणे देखील POCSO कायद्याअंतर्गत येते. यामध्ये प्रायव्हेट पार्टसाठी टच हा शब्द वापरण्यात आला आहे.
दरम्यान, अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर या याचिकेचे समर्थन करत, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र सरकारसह इतर अनेक पक्षांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी पूर्ण झाली.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी न्यायालयात म्हटले होते की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की जर लैंगिक छळाचे आरोपी आणि पीडितेला जर त्वचेपासून त्वचेचा थेट संपर्क नसेल, तर पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचे कोणतेही प्रकरण नाही. त्यानंतर अॅटर्नी जनरलने सुनावले की, न्यायालयाच्या या निर्णयामुळे व्यभिचार्यांना मोकळीक मिळणार असून त्यांना शिक्षा करणे अत्यंत क्लिष्ट आणि कठीण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे तोंड भरुन कौतूक; म्हणाले, नितीन गडकरी खऱ्या अर्थाने काम करतात
‘मी माझा पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी त्यांचे घर चालवून दाखवावे’
आयपीओ लिस्टिंगच्या वेळी ढसाढसा रडले पेटीएमचे मालक; कारण ऐकून हैराण व्हाल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: