अनुष्का शर्माची धडाकेबाज खेळी, ५० धावा करून ५ बळीही घेतले, सोशल मिडीयावर झाले कन्फ्युजन

November 05, 2021 , 0 Comments

वुमन्स अंडर-19 वन-डे चॅलेंजर ट्रॉफीचा सामना मंगळवारी जयपूरमध्ये खेळला गेला, त्यानंतर ट्विटरवर प्रचंड गोंधळ उडाला. झाले असे की, या सामन्यात अनुष्का शर्मा नावाच्या खेळाडूने आपली शानदार खेळी केली आणि इथून ट्विटरवर एकामागे एक मीम्स व्हायरल होऊ लागले.

या खेळाडूबद्दल ट्विटरवर अपडेट येताच विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माबद्दल मीम्सचा पाऊस सुरू झाला. BCCI वुमन्सने लाइव्ह स्कोअर शेअर केला, ज्यामध्ये लिहीले होते की, ‘अनुष्का शर्माने 88 चेंडूत (5×4, 1×6) भारत B 140/0 #U19 चॅलेंजरट्रॉफीमध्ये 52 धावा केल्या.’

सोशल मीडिया वापरकर्त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी लगेच त्यावरून ट्वीट करण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही सांगितलं का नाही की अनुष्का मॅच खेळायला गेली आहे, वामिका रडत आहे. दुसऱ्याने लिहीले की, तिने क्रिकेट खेळायला कधी सुरुवात केली? विराट आणि अनुष्का सध्या दुबईत आहेत आणि या मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

याच्याबद्दल सोशल मीडियावर हशा पिकला असतानाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली नेटकऱ्यांच्या खुप निशाण्यावर होता. एवढेच नाही तर विराट आणि अनुष्काच्या ९ महिन्यांच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्टी ऐकायला मिळत होत्या.

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचला पत्र लिहून अशा प्रकारचे फालतू ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भारताने अफगानिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतरही काही जणांना हा विजय पचला नाही.

अनेक लोकांनी भारतावर फिक्सिंगचे आरोप लावले आहेत. अफगानिस्तान विरूद्धचा हा सामना फिक्स होता असे आरोप काही जण लावत आहे. विशेषत: पाकिस्तानी चाहत्यांना हा विजय बिलकुल पचलेला नाही आणि त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून भारतावर फिक्सिंगचा आरोप लावला आहे.

महत्वाच्या बातम्या
अफगानिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने केली होती मॅचफिक्सिंग? त्या व्हिडीओमुळे चर्चांना उधान
धक्कादायक! पालकांनो काळजी घ्या, ३ वर्षांच्या मुलाने Pop-Up फटाका गिळला आणि गमावला जीव
तारक मेहतामधील या अभिनेत्रीने पार केल्या सगळ्या सीमा; उघडला शर्ट, पहा तिचे बोल्ड फोटो
भारताचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानला लागली मिर्ची, सोशल मिडीयावर येत आहेत असे कमेंट्स


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: