आधार कार्ड हरवलेल्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ ४ स्टेप्स ने पुन्हा मिळवा कार्ड

November 28, 2021 , 0 Comments

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, त्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. बँक खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी, आपली ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड गरजेचे आहे. हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI द्वारे जारी केले जाते, ज्यामध्ये 12 अंकी विशिष्ट क्रमांक असतो.

अनेकांकडून आधार कार्ड हरवल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशावेळी त्यांच्याकडे त्यांचा आधार नोंदणी क्रमांक देखील नसतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी अनेक कामे रखडली जातात मग प्रत्येकाला टेन्शन येते? पण आता कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पुढील स्टेप फॉलो करून ऑनलाईन आधार मिळवू शकता.

स्टेप १
प्रथम तुम्हाला resident.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल, जी UIDAI ची अधिकृत वेबसाइट आहे. येथे तुम्हाला My Aadhar पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप २
यानंतर, तुम्हाला तळाशी दिलेल्या आधार सेवा विभागात जावे लागेल आणि Retrieve Lost or Forgotten EID किंवा UID वर क्लिक करावे लागेल.

स्टेप ३
यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल, जी तुम्हाला येथे भरायची आहे आणि त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ४
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (आधार कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक) वर एक ओटीपी येईल, तो भरावा लागेल आणि नंतर कॅप्चा कोड भरून लॉग इन करावे लागेल. तुमचा आधार कार्डचा नोंदणी क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. तथापि, जर तुमचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

ताज्या बातम्या
 शेतकऱ्यांना काही पैसे मिळाले तर लगेच जळफळाट होतो; महागाईवर ट्विट केल्याने आव्हाड ट्रोल
४७ वर्षीय शिक्षकाने २३ वर्षीय महिला शिक्षकासोबत केले ‘हे’ लाजीरवाणे कृत्य; पोलिसांनी घेतलं ताब्यात
नको तेच झाले! दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
पवारांच्या ‘त्या’ फोटोने आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चा; संतापलेल्या राष्ट्रवादीने उचलेले गंभीर पाऊल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: