मध्यप्रदेशच्या एका गावात अचानक प्रकटला क्रिकेटचा देव, गावकऱ्यांना दिले ‘हे’ वचन
क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने सिहोर जिल्ह्यातील 560 आदिवासी मुलांचे नशीब बदलण्याची जबाबदारी घेतली. मुलांच्या मदतीसाठी त्याने ‘परिवार’ या एनजीओशी हातमिळवणी केली आहे. स्वयंसेवी संस्थेने सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये सेवा कुटीर बांधले आहेत.
आज सचिन तेंडुलकर सेवानिया या सेवा कुटीरमध्ये पोहोचला आणि मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. यावेळी त्याने अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सचिनला अचानक तेथे पाहून अनेक लोकांना आनंद झाला. त्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
सचिन तेंडुलकर बारेला समाजातील आदिवासी मुलांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला. किमान अर्धा तास मुलांसोबत थांबून त्यांच्या अभ्यासावर चर्चा केली. खेळाविषयी मुलांचे मतही त्याने जाणून घेतले. प्रतिसादात मुलांनी क्रिकेट हा आपला आवडता खेळ आहे असे सांगितले.
सचिनने हा दिवस निवडणे त्याच्यासाठी विशेष होते असे सांगितले. 2013 मध्ये याच दिवशी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बुधनी विधानसभेच्या सेवानिया गावात पोहोचल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सचिन तेंडुलकरशी फोनवर 5 मिनिटे चर्चा केली आणि अभिनंदनही केले.
मुलांच्या इच्छेनुसार सचिनने फलंदाजी करताना अनेक शॉट्स मारले. सुमारे 10 मिनिटे फलंदाजी केल्यानंतर तो कारमधून तेथून निघून गेला. मुलांची स्वप्नं पुर्ण करू असे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. सचिन तेंडुलकरने सिहोर जिल्ह्यातील ५६० आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आणि मी त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करेन असे सांगितले.
सचिन आल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक सेवानिया गावात पोहोचले. लोकांना त्याच्यासोबत बोलायचे होते आणि त्याच्यासोबत फोटो काढायचे होते. मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. वाटेत सचिनने कारमधूनच हताश चाहत्यांचे स्वागत केले. शिवनियाहून तेंडुलकर भोपाळला रवाना झाला. भोपाळ विमानतळावरून दिल्लीला परतण्याचे त्याचे वेळापत्रक आहे.
महत्वाच्या बातम्या
तु काय होतास वेड्या, काय झालास; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबातील ५ जणांचा भीषण अपघातात मृत्यु
मोठी बातमी! रस्त्यावर मांस खाणाऱ्यांवर प्रशासन करणार कारवाई; महानगरपालिकेचा निर्णय
विकी आणि कतरिनाच्या लग्नाला सलमान खान येणार नाही; हैराण करणारे कारण आले समोर
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: