अनिल कपूर गंभीर आजाराचा करतोय सामना; जर्मनीतील हाॅस्पीटलमधील व्हिडीओने चाहते चिंतेत

November 27, 2021 , 0 Comments

अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तसेच अनिल कपूर हे आपल्या चाहत्यांना अपडेट देण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर करतात. मग कधी ते सरकारने थिएटर्स उघडले म्हणून पोस्ट करतात तर कधी मुलीच्या लग्नात डान्स केला म्हणून एखादा व्हिडीओ टाकतात.

मात्र सध्या अनिल कपूर यांनी जर्मनीतील एक व्हिडीओ पोस्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडीओमधून अनिल कपूरने हा त्याचा जर्मनीमधील उपचारांचा शेवटचा दिवस आहे. तसेच डॉक्टरांना भेटण्यासाठी जात आहे, असे सांगितले आहे. सुंदर हिमवृष्टीदरम्यान, अनिल कपूर जर्मनीच्या रस्त्यांवर वॉक करताना दिसत आहे. मात्र अनिल कपूरकडून उपचारांसाठी जर्मनीमध्ये गेल्याचा खुलासा केला गेल्याने त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे.

अनिल कपूरने उपचारांसाठी जर्मनीत गेल्याचे सांगितले असले तरी तो कुठल्या आजारावर उपचार करण्यासाठी गेला आहे, हे त्याने सांगितलेले नाही. अनिलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून नेमकं काय झालं आहे याची देखील विचारणा केली मात्र यावर कोणतेही उत्तर फॅन्सला अद्याप मिळालेले नाही .

काय म्हटलंय अनिल कपूरने व्हिडीओमध्ये
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अनिल कपूरने लिहिले आहे की,
बर्फावर एक परफेक्ट वॉक, जर्मनीमध्ये लास्ट डे. मी आपल्या लास्ट ट्रिटमेंटसाठी डॉ. मुलेरीशी भेटण्यासाठी जात आहे.
त्यांचे आणि त्यांच्या मेडिकल टमचे मी आभार मानतो.
व्हिडीओमध्ये अनिल कपूर काळ्या रंगाचा कोट घातलेला आहे, त्यासोबत ब्लॅक कॅप आणि ब्लॅक ट्राऊझर देखील आहे.

ताज्या बातम्या
 खात्यात एकही रूपया नसताना मिळणार १० हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा या भन्नाट योजनेचा लाभ
रतन टाटांच्या ‘या’ कंपनीने दिले एका वर्षात १८० टक्के रिटर्न; राकेश झुनझुनवालांचीही आहे मोठी गुंतवणूक
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत
ठाकरे सरकारचा चांगला निर्णय! कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत; ‘असा’ मिळवा लाभ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: