मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, ममता बॅनर्जी घेणार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

November 25, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष मोदी सरकार विरुद्ध एकत्र येताना दिसत आहे. यासाठी अनेक बैठका होत आहेत. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चित्र काहीसे वेगळे दिसणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. असे असताना आता मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार आहे.

आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 30 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या त्या 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा दौरा 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आखला होता. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी 1 डिसेंबरपर्यंत मुंबईत असणार आहेत. ममता बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी 30 नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. यावेळी अनेक नेते उपस्थित असणार आहेत.

मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबई भेट ही बिझनेस समिटसाठी असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील विरोधी पक्ष या भेटीकडे लक्ष ठेवून आहे.

आता या भेटीत काय राजकीय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून ममता बॅनर्जी यांचे अनेकदा कौतुक केले गेले आहे. शिवसेनेने भाजपविरोधात तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आता या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या काळात देशात काय रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बैठकीत काय चर्चा होणार याकडे राजकीय नेते लक्ष ठेवून आहेत. मोदी सरकार विरोधात काय रणनीती आखायची यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: