आता पाकिस्तानी मंत्र्यानेही उडवली टीम इंडियाची खिल्ली, म्हणाले, जर नामिबीयाला ३ षटकांत हरवले..
न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या विजयाने भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर चाहते वेगवेगळ्या प्रकारे आपला राग काढत आहेत. काही चाहते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीम इंडियाला प्रचंड शिव्या देत आहेत, तर काही मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियाला ट्रोल करत आहेत.
पियुष चावलानेही पोस्ट शेअर केली आहे. या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या नावाचाही समावेश आहे. सेहवागनेही मीमच्या माध्यमातून टीम इंडियाची खिल्ली उडवली. वर्ल्ड कपमधून भारताच्या बाहेर पडल्यावर सेहवागने लिहिले, ‘खतम, बाय-बाय, टाटा, गुड बाय’
चित्रपटांचे काही विनोदी सीन्स टाकून टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनीही एका ट्विटद्वारे टीम इंडियाला ट्रोल केले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, ‘टीम इंडियाने नामिबियाला 3 षटकांत हरवले तर ते लवकर विमानतळावर पोहोचू शकतात.
एका युजरने चाहत्यांची खिल्ली उडवली आहे ज्यांना अजूनही टीम इंडिया बाहेर आहे यावर विश्वास बसत नाहीये. एका यूजरने अफगाणिस्तानला भारताच्या आशा नष्ट केल्याने खुप शिव्या दिल्या आहेत. टी-20 विश्वचषकाच्या सुरुवातीला एकामागून एक दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया सुरुवातीपासूनच विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर होती.
न्यूझीलंडने ग्रुप 2 चे सामने देखील गमावले तर भारत निव्वळ धावगतीच्या आधारावर उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल हीच त्यांची आशा होती. पाकिस्तानने यापूर्वीच न्यूझीलंडचा पराभव केला होता. इतर संघांमध्ये अफगाणिस्तानकडूनच आशा होती, पण तसे झाले नाही.
न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तान कुठेही टिकू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला केवळ 124 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 2 गडी राखून लक्ष्य सहज गाठले आणि भारताचे स्वप्न तुटले. जरी आज भारताने नामिबीयाविरूद्धचा सामना जिंकला असला तरी त्याचा काहीच फायदा नाही.
**BIG NEWS FOR INDIA**
If they finish the match in 3 overs against Namibia tomorrow, they can reach airport early. (As Rcvd) #Endia #ICCT20WorldCup
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) November 7, 2021
महत्वाच्या बातम्या
तुमच्याकडे जास्त पैसा आहे याचा अर्थ असा नाही की.. कपिल देव टीम इंडियावर भडकले
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मोठे यश, ‘त्या’ अधिकाऱ्यास झोपेतून उठवा; न्यायालयाचे सरकारला निर्देश
अभिनेत्री कंगना राणावत व अदनान सामी यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान
आधी प्रेयसीचे नाक आणि कान कापले, नंतर म्हणाला मी तिला देव मानतो, मला असे करायचे नव्हते
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: