जळगाव हादरले! दारूसाठी पैसे न दिल्यानं अल्पवयीन तरुणानं केलं भयंकर कृत्य

November 22, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी । जळगवातील छोटा माया नामक एका अल्पवयीन मुलाने सलून व्यवसायिक तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याच्या कारणावरून या मुलाने तरुणाच्या छातीवर चॉपरने वार केला. यात तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजता चौघुले प्लॉट परिसरात ही घटना घडली. सुनील सुरेश टेमकर (वय ३६, रा. प्रजापतनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आजारी असल्याने सुनीलने गेल्या पाच दिवसांपासून दुकान बंद ठेवले होते. रविवारी त्याने दुकान सुरू केले होते. दरम्यान, रात्री १० वाजता त्याच्या दुकानाजवळ छोटा माया आला होता. त्याने सुनीलकडे दारू पिण्यासाठी पैसे तसेच एक ब्लेड मागितले. सुनीलने देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने मायाने चॉपरने सुनीलच्या डाव्या बरगडीच्या वर छातीवर एक वार केला. चॉपर थेट शरीरात घुसल्यामुळे सुनील अत्यवस्थ झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अशात नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. वाचा: या घटनेमुळे शनिपेठ, चौघुले प्लॉट परिसरात तणाव निर्माण झाला. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना शनिपेठ पोलिसांना केल्या आहेत. मृत सुनील याच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, लहान भाऊ असा परिवार आहे. सुनीलच्या खुनानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मायाला पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजता ताब्यात घेतले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: