मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित, आजपासून कामावर येणार

November 27, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम होते. असे असताना राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव दिला. असे असताना देखील एसटी कामगार हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते.

आता मात्र त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून कर्मचारी कामावर येण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने विलीनीकरणाची मागणी कायम ठेवून हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कोल्हापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

याबाबत मुंबई सेंट्रल मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री, महामंडळ एमडीसह कृती समितीचे 28 सदस्य उपस्थित होते. या बैठकीत एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी चर्चा झाली. कोल्हापूर आगारातील कर्मचारी आजपासून काम सुरू करणार आहेत.

दोन दिवसांपूर्वीच आंदोलनात ठाण मांडून बसलेले भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली होती. आझाद मैदानातील आंदोलन आम्ही तात्पुरते स्थगित कर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले होते. मात्र कर्मचारी आंदोलन करत होते.

यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली होती. याबाबत अनेक बैठका झाल्या. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली. तसेच पगार देखील वेळेवर होतील असेही सांगितले गेले. आता आजपासून कोल्हापूर आगारातील गाड्या नियमितपणे धावणार आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: