गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात, पण…; वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची बाजू मांडणारी ‘शालू’ची खास पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या फ्रँड्री चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळालेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवर बोलताना दिसते, तसेच ती बऱ्याचदा फोटो शेअर करताना दिसते.
फोटोंमुळे काही लोक तिला ट्रोलही करतात, पण त्या लोकांनाही ती सडेतोड उत्तर देताना दिसते. आता सध्या शालूची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची बाजू मांडली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायलर होताना दिसत आहे.
कृपया थोडी दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या माता बहिणींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाही. असे म्हणत तिने वेश्या व्यवसायातील महिलांची बाजू मांडणारी पोस्ट लिहिली आहे. तिच्या पोस्टचे सोशल मीडियावर खुप कौतूक होत आहे.
राजेश्वरी खरातची पोस्ट-
तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या.
स्त्रीने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो.
गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठीच खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात.
समाजात आणखी बर्याच काही गोष्टी वेश्ये बद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत, अशी पोस्ट राजेश्वरी खरातने केली आहे.
या पोस्टसोबत राजेश्वरीने एक फोटोही शेअर केला आहे. आपल्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीने समाजातील लोकांना आवाहन केले आहे. आपल्याच समाजातील असलेल्या काही घटकांना अनेक अडचणींना सामोरे जात असतात. अशा महिलांना आपण मदत करु शकत नसलो तरी त्यांना निदान सन्मानाची वागणूक तरी द्यायला हवी, असे राजेश्वरीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आर. आर. आबांच्या मृत्यूला 7 वर्ष पूर्ण, मुलगी स्मिताने सांगितली मृत्यूपूर्वीची कहाणी, म्हणाल्या..
भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार रोहित शर्मा कि केएल राहूल? विराट कोहली म्हणाला…
…तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन!! विराट कोहलीचे धक्कादायक वक्तव्य
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: