मुकेश अंबानी ‘या’ श्रीमंत कुटुंबाचे आहेत जबरी फॅन, त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवणार

November 27, 2021 , 0 Comments

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आपले २०८ अब्ज डॉलरचे व्यवसायाचे साम्राज्य नव्या पिढीच्या हाती सोपवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी मालमत्तेबाबत आणखी वाद होऊ नयेत, यासाठी ते एकापाठोपाठ एक ठोस आराखडा तयार करत आहेत.

मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यात शेअरवरून बराच वाद झाला होता. यामुळेच मुकेश अंबानी आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, अंबानी यांनी जगभरातील अब्जाधीश कुटुंबांच्या उत्तराधिकारी मॉडेलचा अभ्यास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अमेरिकेतील दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्ट इंकच्या वॉल्टन कुटुंबाचे मॉडेल आवडले आहे. वॉल्टन कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. जगातील टॉप २० श्रीमंतांमध्ये या कुटुंबातील ३ सदस्यांचा समावेश आहे.

वॉल्टन कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. याचे कारण असे की वॉलमार्ट ही कंपनी कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची कुटुंबाकडे अजूनही ४७ टक्के हिस्सेदारी आहे. वॉलमार्टची स्थापना १९६२ मध्ये सॅम वॉल्टन यांनी केली होती. जानेवारी २०२१ मध्ये त्याची कमाई ५५९ अब्ज डॉलर होती. कंपनीची जगभरात ११,५१० रिटेल स्टोअर्स आहेत, त्यापैकी ५३४७ एकट्या यूएस मध्ये आहेत.

१९९२ मध्ये कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या निधनानंतर, अंबानी त्यांच्या व्यवसाय हस्तांतरणाच्या पद्धतीमुळे खूप प्रभावित झाले. १९८८ पासून, वॉल्टन कुटुंबाने कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी व्यवस्थापकांकडे सोपवली आणि त्यावर देखरेख करण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. सॅमचा मोठा मुलगा रॉब वॉल्टन आणि त्याचा पुतण्या स्टुअर्ट वॉल्टन वॉलमार्ट बोर्डावर आहेत.

सॅमने त्याच्या मृत्यूच्या ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५३ मध्ये उत्तराधिकाऱ्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या कौटुंबिक व्यवसायातील ८० टक्के हिस्सा त्याच्या ४ मुलांना अॅलिस, रॉब, जिम आणि जॉनला दिला. आज त्यांची एकूण संपत्ती २२७.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती ८९.७ अब्ज डॉलर्स आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जिम वॉल्टन ६५.७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १६ व्या क्रमांकावर आहे. त्याचा भाऊ रॉब वॉल्टन ६५.२ अब्ज डॉलर्स संपत्तीसह १७ व्या क्रमांकावर आहे आणि बहीण अॅलिस वॉल्टन ६३.७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह १९ व्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या-
खात्यात एकही रूपया नसताना मिळणार १० हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा या भन्नाट योजनेचा लाभ
रतन टाटांच्या ‘या’ कंपनीने दिले एका वर्षात १८० टक्के रिटर्न; राकेश झुनझुनवालांचीही आहे मोठी गुंतवणूक
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: