दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ व मारहाण; मात्र, पुढे जे झालं ते सुन्न करणारं!

November 18, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी, नागपूर दारू प्यायल्यानंतर व केल्याने युवकाने दगडाने डोके ठेचून मित्राची हत्या केली. हत्येनंतर मारेकरी युवकाने रक्ताने माखलेल्या कपड्यासह नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. ही थरारक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नंदनवनमधील सेंट झेव्हियर शाळेमागील मैदानात घडली. (an angry friend ended the life of a friend after beaten up by friend drinking alcohol) क्लिक करा आणि वाचा- दिनेश विनायक राजापुरे (वय ४०, रा. दर्शन कॉलनी) असे मृतकाचे तर अतुल हेमराज शिवणकर (वय २३, रा. श्रीनगर) असे मारेकरी युवकाचे नाव आहे. दोघेही पेंटिंगची कामे करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी दोन अपत्यांसह त्याला सोडून माहेरी गेली. तो दर्शन कॉलनीत भाड्याने राहायचा. बुधवारी दुपारी दिनेश व अतुल या दोघांना कामाचे एक हजार रुपये मिळाले. त्या पैशांतून दोघांनी दारू खरेदी केली. दोघेही शाळेमागील मैदानात आले. दोघांनी दारू प्यायली. क्लिक करा आणि वाचा- दोघेही दारू प्यायल्यानंतर दिनेशने अतुलला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे अतुल संतापला. अतुलने दगडाने दिनेशचे डोके ठेचून खून केला. त्यानंतर अतुल रक्ताने माखलेले हात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये धडकला. मित्राची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांचे पथक अतुलला घेऊन घटनास्थळी गेले. पंचनामा करून दिनेशचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अतुलला अटक केली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: