फटाके फोडू नका माझे पाळीव कुत्रे घाबरतात म्हणणाऱ्या अनिल कपूरच्या मुलाला लोकांनी केले ट्रोल, म्हणाले…

November 08, 2021 , 0 Comments

यंदाच्या दिवाळीला काही सेलिब्रिटींनी फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. अशात प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूर ट्विटरवर ट्रेंडवर आहे. त्यानेही फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे लोकांनी त्याच्यासह अनिल कपूरलाही ट्रोल केले आहे.

#अनिलआपलापिल्ला_संभाल अशा हॅशटॅगसह लोकांनी त्याला ट्रोल केले आहे. हर्षवर्धनने दिवाळीच्या दिवशी एक ट्विट केले होते. त्यात त्याने फटाके फोडणे हे पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असून त्याचे पाळीव प्राणी घाबरतात असे म्हटले होते. हे लिहिताच लोकांनी हर्षवर्धनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर यावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले आहे.

हर्षवर्धन यांनी या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच त्यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. पण हे ट्विटर आहे. येथे ट्रोलिंग इतक्या लवकर थांबत नाही. लोकांनी हर्षवर्धनच्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्याचा वापर करून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्विट काय होते?
हर्षवर्धनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, लोक अजूनही सर्वत्र फटाके फोडत आहेत. माझे पाळीव प्राणी घाबरले आहेत. घरातल्या प्रत्येकाला अस्वस्थ वाटतंय आणि खरं तर ते वातावरणासाठी खुप वाईट आहे. यामुळे मी कधीही सांस्कृतिक बंधनात जखडलो नाही. कधीकधी लोकांमध्ये समजूतदारपणा असणे महत्त्वाचे असते.

यानंतर हर्षवर्धनला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. बहीण सोनम कपूरलाही अनेकांनी ट्रोल केले. तर काहींनी वडील अनिल कपूर यांचा जुना फोटो आणि व्हिडिओ समोर आणला. यामध्ये बॉलीवूडचा ‘झक्कास’ माणूस फटाके फोडताना दिसला.

अशाच एका ट्विटला हर्षवर्धनने उत्तर दिले. लिहिले, हे ५ वर्षांपूर्वी होते. या वर्षी आम्ही असे काही केले नाही. आम्ही आता समजदार झालो आहोत. दिवाळीच्या शुभेच्छा. दुसरीकडे लोकांचे हल्ले सुरूच होते. एका युजरने अनिल कपूरचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ढोंगी आहे सर्व.

दुसरा युजर्स म्हणाला, हर्ष, तुझ्या कुटुंबातील सदस्यांना अक्कल शिकवण्याची तुझ्यासाठी ही योग्य संधी आहे.आशुतोष नावाच्या युजरने संपूर्ण बॉलिवूडवर निशाणा साधत लिहिले. बॉलिवुड लोक पान मसाल्याच्या जाहिराती करतात, जो कॅन्सरला जबाबदार आहे. परंतु प्रत्येकजण आपले ज्ञान फक्त सणांवरच देईल, कारण ते ट्रेंडी दिसते.

याआधी हर्षवर्धनची बहीण रिया कपूर हिने सर्वांना दिवाळीत फटाके न वापरण्याचे आवाहन केले होते. रियाने इंस्टाग्रामवर लिहिले, फटाके फोडणे ही केवळ जुनी मानसिकता नाही तर घोर अज्ञान, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा देखील आहे. ते करणं थांबवा. त्यानंतर तिलाही ट्रोल करण्यात आले आहे. मात्र अद्याप या संपूर्ण प्रकरणावर अनिल कपूरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-
‘’इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी’’
..मग बॅग भरायची आणि घरी जायचं, पत्रकाराच्या प्रश्नाला जडेजाने दिले भन्नाट उत्तर, वाचून लोटपोट व्हाल
गुलाबराव पाटलांनी कव्वाली गायल्यानंतर नितेश राणे म्हणाले, कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: