लेडी सिंघम! मृत्युच्या तावडीतून युवकाला वाचवले, खांद्यावर घेऊन पोहोचवले हॉस्पिटलमध्ये, पहा व्हिडीओ
देशात खाकी वर्दीला बदनाम केल्याच्या बातम्या रोज समोर येत असतात. त्यामुळे पोलिस विभागासह त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र मुसळधार पावसात चेन्नईतील एका महिला पोलीस निरीक्षकाने एवढे अप्रतिम कर्तव्य बजावले की सगळेच तिला सलाम करत आहेत.
त्यांचा शौर्य आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी झाडाखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले आणि त्याला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेले. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून चेन्नईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहर जलमय झाले असून अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत.
दरम्यान, गुरुवारी स्मशानभूमीजवळ 28 वर्षीय तरुण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. तेवढ्यात जोराचा वारा आला आणि तो झाडाखाली अडकला. त्यानंतर इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्या मोबाईलवर एक फोन आला की, एक तरुण एका जड झाडाखाली गाडला गेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यानंतर त्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.
लेडी इन्स्पेक्टर धावत आल्या आणि झाड काढून गाडलेल्या तरुणाला बाहेर काढले आणि आपल्या खांद्यावर घेतले. यानंतर त्यांनी त्याला अनवाणीच त्यांच्या खांद्यावर बसवून एका गाडीमध्ये बसवले. इतकंच नाही तर स्वत: त्याला ऑटोमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्यासोबत त्यांच्या टीमचा एक शिपाईही पाठवण्यात आला होता.
लेडी इन्स्पेक्टरने मांडलेल्या माणुसकीच्या उदाहरणाचे सर्वजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर त्या स्टार बनल्या आहे. चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी महिला निरीक्षकाच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, राजेश्वरीने अप्रतिम काम केले आहे.
जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या तरुणाला त्यांनी उचलून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला प्रचंड लोकांनी पाहिले असून त्यांच्या या कार्याला लोकांनी सलाम केले आहे.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: TP Chatram Police Station's Inspector Rajeshwari carries an unconscious man, on her shoulders, to an autorickshaw in a bid to rush him to a nearby hospital.
Chennai is facing waterlogging due to incessant rainfall here.
(Video Source: Police staff) pic.twitter.com/zrMInTqH9f
— ANI (@ANI) November 11, 2021
महत्वाच्या बातम्या
बापरे! दिल्लीचा कर्णधार सोडणार संघ, मेगा ऑक्शनमध्ये लागू शकते २० कोटींची बोली
मारुती सुझुकीची सर्वात जबरदस्त कार लाँच, देणार २६ किलोमीटर मायलेज किंमत फक्त…
कंगना राणावतने सांगितला आपला आवडता पक्ष, म्हणाली ‘हा’ नेता माझा सुपरस्टार आहे
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: