अखेर मलिकांनी बॉम्ब फोडलाच!! बनावट नोटा, अंडरवर्ल्डशी संबंधितांना महामंडळ, आता फडणवीस अडचणीत

November 10, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत. ड्रग्ज प्रकरण, अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यावरून जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. काल फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर आज मलिक यांनी मोठे गौप्यस्फोट केले.

ते म्हणाले, ड्रग्ज प्रकरणाचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून NCBच्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले गेले. असा बॉम्ब त्यांनी फोडला.

तसेच हे जाळे थेट दाऊदपर्यंत पोहोचले होते. देशात नोटा जप्त केल्या गेल्यात. नोटबंदीत एक वर्षात राज्यात बनावट नोटांचे जाळे. देशात नोटा जप्त, मात्र, राज्यात कारवाई केली गेली नाही. बनावट नोटांचे प्रकरण दाबले गेले, असेही ते म्हणाले.

भाजपची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले. नागपूरचा मुन्ना यादव याच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे, असे म्हणत मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत.

हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंगलादेशातील लोकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. यामुळे त्यांनी मुख्यमंत्री असताना असे अनेक गैरमार्गाने कामे केली आहेत.

हाजी अरफात शेख ज्याला फडणवीस यांनी अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष केला होता. याचा हा छोटा भाऊ आहे जो खोट्या नोटांचे रॅकेट चालवतो, असेही ते म्हणाले. यामुळे आता पुढे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: