ताडोबात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडली घटना
चंद्रपूर । येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. पर्यटकांच्या डोळ्यांसमोर ही घटना घडल्याने एकच थरकाप उडाला.
कोलारा वनपरिक्षेत्रात गेटजवळ ही घटना घडली. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. काही क्षणातच ही घटना घडली. यानंतर सर्वजण घाबरले होते.
याबाबत माहिती अशी की, स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण करत होत्या. तेव्हा त्यांना २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. यावेळी त्यांनी सावध होत आपला मार्ग बदलला. मात्र काही वेळातच वाघीणीने आक्रमक रूप धारण केले.
काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. नंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पहिल्यांदाच ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला आहे, पहिल्यांदाच ही घटना घडली असून यावेळी अनेक पर्यटक उपस्थित होते. याबाबत संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. वनविभागाच्या वतीने त्यांच्या कुटूंबाला पाच लाख दहा हजारांची तातडीची मदत देण्यात आली.
त्यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरल्या आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथे वाघ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटन येत असतात.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: