कसाबच्या हल्ल्यात ओंबळेंच्या खिशातील नाण्यावर लागली गोळी; तेच नाणे कोर्टात ठरले महत्वाचे; वाचा किस्सा..

November 27, 2021 , 0 Comments

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी ३१ जणांचे प्राण घेतले. जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं.

नुकतीच या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर यामध्ये जिवंत पकडलेल्या कसाबला देखील फासावर लटकवण्यात आले. याच कसाबला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे शहीद झाले होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गे आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले होते. त्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांपैकी इस्माइल खान व अजमल कसाब हे दहशतवादी स्कोडा कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. गिरगाव येथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांची कार अडवली आणि त्यांना घेरले. त्यावेळी झालेल्या चकमकीत इस्माइल खान मारला गेला तर बंदुकधारी कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले होते.

यावेळी धाडसी तुकाराम ओंबळे यांनी कसाब गाडीतून खाली उतरताच त्याला घट्ट मिठी मारली. णून त्याने ५ राउंड फायर केले. पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. पुढे ओंबळे यांना मरणोत्तर अशोक चक्र देखील प्रदान करण्यात आले.

कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी झाली होती. मात्र, तो जिवंत पकडला गेल्यामुळंच मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं होतं. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाटला होता. याच कामगिरीची दखल घेऊन पोलिसांना बक्षीस देण्यात आलं आहे.
ताज्या बातम्या

संपूर्ण जोशी कुटुंबाने विष घेऊन केली आत्महत्या ! परिसरात एकच खळबळ
ठाकरे सरकारचा चांगला निर्णय! कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत; ‘असा’ मिळवा लाभ
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: