'जिल्हा रुग्णालय आग'प्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई; उचलले 'हे' कठोर पाऊल
मुंबई: जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागातील आगी प्रकरणी (Ahmednagar Civil Hospital Fire) राज्य सरकारने गंभीर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर दोन वैद्यकीय अधिकारी आणि एका स्टाफ नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, या प्रकरणी दोन स्टाफ नर्सना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. ( state government suspends two medical officers including a district surgeon and dismissed two nurses) अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत घोषित केले आहे. क्लिक करा आणि वाचा- निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत ताशेर ओढले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, या दुर्घटनेती मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपये व राज्य आपत्ती निधीमधून २ लाख रुपये अशी ७ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: