राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राजकारणातून संन्यास घेणार? स्वत:च पोस्ट करून दिले संकेत
पुणे । शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. आधी घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचार करण्याचा मनसुभाही त्यांनी बोलून दाखवला आहे. यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल गूढ वाढले आहे. ते म्हणाले, ही सिंहावलोकनाची वेळ आहे. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत आणि वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. काही अनपेक्षित पावले उचलली गेली.
हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आला आहे. तो थोडा शारीरिक, बराचसा मानसिक आहे. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं, थोडं मनन आणि थोडं चिंतन!
घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने! अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे आता ते कुठे जाणार का? अशीही चर्चा सुरू आहे.
तसेच फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असेही म्हटलेले आहे. यामुळे आता पुढे ते राजकारणातून बाजूला होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याची आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरूण तडफदार नेते म्हणून ओळखले जातात. पहिल्याच निवडणूकीत ते खासदार म्हणून निवडून आले. पुन्हा राष्ट्रवादीला विधानसभेला त्यांचा फायदा झाला होता. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: