आज्जीच्या जिद्दीला सलाम! 104 वर्षीय आज्जीने शिक्षण परीक्षेत मिळवले 89 गुण
अनेकांना शिक्षणाची मोठी आवड असते, आणि ते कोणत्याही वयात शिक्षण घेतात. शिक्षण घेण्यासाठी वयाची अट देखील नसते. आता केरळचे शिक्षण मंत्री वायुदेवन शिवनकुट्टी यांनी ट्विटर अकाऊंटवर 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी राज्य सरकारच्या निरंतर शिक्षण उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याने एक फोटो शेअर केला आहे.
केरळ राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण हे राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे मिशन आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी साक्षरता, सतत शिक्षण आणि आजीवन शिक्षणाचा प्रसार करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये अनेकजण शिक्षण घेत आहेत.
जर शिक्षण घेण्याची आवड असेल तर काय होऊ शकते हे केरळच्या आजी अम्मा कुट्टियम्मा यांनी दाखवले आहे. त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करत हे साध्य केले आहे. यामुळे त्यांची देशात चर्चा सुरू आहे.
शिकायला वय नसते हे त्या आज्जीनी सिद्ध करून दाखवले आहे. कोट्टायम जिल्ह्यातील 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी राज्य शिक्षण परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवून लोकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या वयात असे शिक्षण घेणाऱ्या त्या एकमेव ठरल्या आहेत.
केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी कुट्टीअम्मा यांचे अभिनंदन केले आहे. कोट्टायम जिल्ह्यातील 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी केरळ राज्य साक्षरता अभियान परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले आहेत. तसेच शिक्षणमंत्री म्हणाले की, कुट्टीअम्मा यांनी हे यश मिळवून दाखवून दिले आहे की वाचन आणि लेखनासाठी वय लागत नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो.
कुट्टीअम्मा कधीही शाळेत गेलेली नाही. तिला फक्त वाचता येत होते, पण लिहिता येत नव्हते. साक्षरता प्रेरक असल्याने कुट्टीअम्माला लिहायला शिकवले. त्यांनी आता हे मोठे यश प्राप्त केले आहे. आता त्यांचीच चर्चा सुरू आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: