T20 मधील नंबर वन बॅट्समनला वर्ल्डकपमध्ये नाही मिळणार संधी! खेळणार धोनीचा ‘हा’ खास खेळाडू

October 23, 2021 , 0 Comments

जगातील नंबर वन फलंदाज ‘डेव्हिड मलानला’ टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना खेळणे कठीण आहे. इंग्लंडकडून खेळताना तो दोन्हीही सराव सामन्यात अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी ‘मोईन अलीला’ क्रमांक ३ वर संधी दिली जाऊ शकते. मोईनने आयपीएल २०२१ मध्ये CSK साठी दमदार कामगिरी केली आहे. याशिवाय तो स्पिन गोलंदाजीसह संघाला बैलंसही देईल.

इंग्लंडने बुधवारी दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने ७ गडी राखून पराभव केला होता. इंग्लंडचा संघ वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजशी शनिवारी, २३ ऑक्टोबर रोजी सामना करेल. गतविजेत्या वेस्ट इंडिजने दोन्ही सराव सामन्यात अपयश आले आहे. डेव्हिड मलानच्या टी -२० आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्याने ३० सामन्यांमध्ये ४३ च्या सरासरीने ११२३ धावा केल्या आहेत.

या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३९ झाला आहे, जो खूप चांगला आहे. त्याने एक शतक आणि ११ अर्धशतके देखील केली आहेत. पण त्याने आपल्या कारकिर्दीतील बहुतेक सामने घरीच खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला १५ चेंडूत फक्त ११ धावा करता आल्या. याआधी भारताविरुद्ध तो १८ चेंडूत फक्त १८ धावा करू शकला होता. दुसऱ्या सराव सामन्यात मोईन अलीला विश्रांती देण्यात आली. त्याने पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध २० चेंडूत ४३ धावांची नाबाद खेळी केली.

अशा परिस्थितीत त्याला संघात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. २०१६ च्या टी -२० विश्वचषकानंतर पॉवरप्लेबद्दल बोलायचे झाले तर, मोईन अलीचा स्ट्राईक रेट १२६ आहे, तर मलानचा फक्त ११५ आहे. मलानचा फॉर्म इंग्लंडसाठी यंदा चांगला राहिला नाही. त्याची सरासरी २७ आहे आणि स्ट्राइक रेट फक्त ११४ आहे. मोईन अलीने आयपीएल फायनलमध्येही आक्रमक खेळी खेळली आणि एमएस धोनीच्या टीमला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

लियाम लिव्हिंगस्टोनचे पहिल्या सामन्यात खेळणे हे ही निश्चित झाले आहे. तो ऑफ स्पिनर म्हणून फलंदाजीने संघाला मजबूत करतो. त्याने सराव सामन्यात भारताविरुद्ध ३० आणि न्यूझीलंडविरुद्ध एक धावा केल्या. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विकेट घेतली. युएईच्या संथ खेळपट्टीवर गोलंदाज म्हणून तो संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्याच्या एकूण टी -२० विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्याने २ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट १४५ आहे. तो मोठे शॉट मारण्यासाठी ओळखला जातो.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: