sameer wankhede: 'कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे'; आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंचा मोठा आरोप
मुंबई: क्रूझवरील ड्रग पार्टीवर () छापा मारणारे अमली पदार्थ विरोधी विभागाचे ( NCB) विभागीय संचालक (Sameer wankhede) चर्चेत आले आहेत. या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री () यांनी एनसीबीवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर वानखेडे प्रकाशझोतात आले आहेत. मात्र, आता ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. ड्रग पार्टी प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू असताना आता वानखेडे यांनी स्वत: मुंबई पोलिसांकडे एक तक्रार केली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, अशी वानखेडे यांची तक्रार आहे. यासाठी वानखेडे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांचीही (DGP) भेट घेतली. (ncb zonal director has lodged a complaint with mumbai police alleging that some police personnel are keeping watch on me) मुंबईतील समुद्रात एका क्रूझवरील ड्रग पार्टीवर मोठी कारवाई करत एनसीबीने काही लोकांना अटक केली. यात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत मुंबई पोलिसही सक्रिय झाले आहेत. आपल्यावर पाळत ठेवण्याबाबतची तक्रार करत असताना वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पाळत ठेवली जात असल्यासंदर्भात काही पुरावे देखील सादर केले आहेत. तसेच या तक्रारीशी संबंधित काही सीसीटीव्ही फूटेजही मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. क्लिक करा आणि वाचा- वानखेडेंवर कशासाठी ठेवली जात आहे पाळत? अमली पदार्थ विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कशासाठी पाळत ठेवली जाते हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ज्या ठिकाणी वानखेडे यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्मशानभूमीत आईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दोन संशयीत व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचे वानखेडेंना लक्षात आले. ज्या स्मशानभूमीत वानखेडे यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी वानखेडे वरचेवर जात असतात. क्लिक करा आणि वाचा- दोन व्यक्ती आपला पाठलाग करत आहेत याचा संशय त्यांना काल सोमवारी ११ ऑक्टोबरला आला. त्यानंतर त्यांन आपला पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेजही मिळवले. त्यानंतर या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. पाठलाग करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मुंबई पोलिस दलात एका महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- वानखेडे यांच्या या दाव्यामुळे या ड्रग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस सखोल चौकशी करतील अशी अपेक्षा समीर वानखेडे यांना आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: