अंबानी आणि RSS ची फाईल मंजुरीसाठी ३०० कोटींची लाच दिली होती, राज्यपालांचा खळबळजनक दावा
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते सध्या मेघालयाचे राज्यपाल आहेत. त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी अंबानी आणि संघातील एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहे. यामुळे आता याची देशात चर्चा सुरू झाली आहे.
ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना ३०० कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा त्यांनी केला आहे. अंबानी आणि संघातल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या संदर्भात दोन फायली मंजूर करण्याच्या बदल्यात हा मोबदला मिळणार होता हा त्यांचा दावा आहे.
असे असताना कायद्यात न बसणारे कुठलेही काम आपण करणार नाही असे सांगत आपण ती ऑफर फेटाळल्याचे ते म्हणाले. सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. राजस्थानमधील झुनझुनू येथे एका समारंभात त्यांना हे वक्तव्य केले. मलिक यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाल्यानंतर दोन फायली माझ्याकडे आल्या होत्या.
त्यातील एक अंबानी यांच्याशी संबंधित होती व दुसरी फाईल रा. स्व. संघाशी संबंधित व्यक्तीची होती. हे गृहस्थ जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी होते. मात्र मी त्यांना स्पष्ठ नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन्ही फायलींशी निगडित प्रकरणांत गैरव्यवहार झाले असल्याचे मला दोन खात्यांनी कळविले. त्यामुळे मी या दोन्ही फायली मंजूर केल्या नाहीत. या फायलींना मंजुरी दिल्यास प्रत्येक प्रकरणाचे १५० कोटी असे तीनशे कोटी रुपये मिळतील, असे काही सचिवांनी मला सांगितले होते.
त्यानंतर त्यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली. त्यांनी मला कायद्यानुसार काम करण्याचे सांगितले असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मला त्यांनी कसलाही भ्रष्टाचार खपवून न घेण्याचे सांगितले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: