क्रूझ रेड: 'NCBच्या 'त्या' अधिकाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते!'
मुंबई: मुंबईत क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्याचे एनसीबीने सांगितले पण ही कारवाई संशयास्पद आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी व खासगी व्यक्तीचा सक्रिय सहभाग कसा, त्यांच्या हातात आरोपींना का सोपवले, याची समाधानकारक उत्तरे एनसीबीचे अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कारवाई पारदर्शी, नियम व कायद्याला धरून तसेच व्यावसायिक पद्धतीने केली हा दावा खोटा असून सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. या छापा प्रकरणात सहभागी एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांवर महासंचालक यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी केली आहे. ( ) वाचा: मुंबईत गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत यांनी एनसीबीच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर प्रचंड मोठा अमली पदार्थांचा साठा सापडला असताना त्यावर कारवाई झाली नाहीच पण ती बातमीही प्रसारमाध्यमातून गायब झाली आणि मुंबईत क्रूझवर छापे मारून काहीतरी मोठी कारवाई केल्याचा आव आणत एनसीबीने मुंद्रा प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी या छाप्याची पोलखोल केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक तर केंद्रीय तपास यंत्रणा सत्ताधारी भाजपासाठी काम करतात काय? असा प्रश्न उपस्थित होतो. खुलासा करण्यासाठी एनसीबीने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रश्नांना बगल देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई कायद्याला अनुसरुन, नियमानुसार, अत्यंत पारदर्शक व व्यावसायिक दृष्टीने केली असून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही, असा दावा केला आहे परंतु वस्तुस्थिती त्याच्या विपरित आहे. एनसीबीचे हँडबुक पान ७० वर नमूद केल्यानुसार अटक केल्यानंतर आरोपीला त्या व्यक्तीला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवायचे असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याची संमती हवी आणि कागदपत्रावर तो सोपवाल्याची नोंद व सह्या असल्या पाहिजेत. असे असताना एक खासगी व्यक्ती, भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडे आरोपीला कसे काय दिले? याचे उतर एनसीबीने दिलेले नाही, उत्तर देण्यास टाळाटाळ केली. वाचा: एनसीबीच्या हँडबुक पान ६९ वर लिहिले आहे की, ज्यांनी त्याला अटक केली त्याच अधिकाऱ्याने २४ तासाच्या आत दंडाधिकाऱ्याकडे हजर करावे, सुरक्षेची जबाबदारीही त्याचीच असते. असे असताना कस्टडीतील आरोपीचा सेल्फी कसा काय घेतला गेला? एनडीपीएस अॅक्टनुसार ज्या अधिकाऱ्याकडे आरोपीची कस्टडी आहे त्या अधिकाऱ्याने आरोपीची मदत केली, संगनमत केले, रुलबुकचे उल्लंघन केले तर त्याला १० वर्षांपेक्षा जास्त सश्रम कारावासाची शिक्षा व किमान १ लाख रुपयाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. नियम पाहता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईवेळी नियमांचे पालन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे या छाप्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व अधिकाऱ्यांवर व ज्या अधिकाऱ्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एनसीबी महासंचालक यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. अन्यथा एनसीबी कारवाई मागे भाजपचा राजकीय अजेंडा आहे हे स्पष्ट होते, असेही सचिन सावंत यांनी नमूद केले. एनसीबीने दिलेल्या उत्तरात विसंगती एनसीबीने हा स्वतंत्र साक्षीदार आहे असे म्हटले आहे तर भानुशाली स्वतःच सांगतो की तो फक्त माहिती देणारा आहे. एनसीबी व भाजपाचे काय संबंध आहेत याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र, व बॉलिवूडला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून या प्रकरणाची खोलवर चौकशी केली तर अनेक चेहरे उघडे पडतील असेही सावंत म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: