वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास; NCB म्हणते...

October 28, 2021 0 Comments

मुंबई: मुंबई प्रकरणात अडकेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा याला सोडण्यासाठी २५ कोटी रुपये मागितले गेल्याचा आरोप याच प्रकरणातील स्वतंत्र पंच साक्षीदार याने केला आहे. या आरोपाची दखल घेत संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी यांची एनसीबीच्या विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. वानखेडे आणि आरोपकर्ता प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी होणार होती मात्र साईल हजर राहिला नाही. मुंबई पोलिसांपुढे याबाबत आपला जबाब नोंदवणारा साईल एनसीबीच्या तपास पथकापासून दूर राहिल्याने नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत तपास पथकाचे प्रमुख आणि एनसीबीचे उपमहासंचालक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एनसीबीची भूमिका स्पष्ट केली. ( Latest News ) वाचा: प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात त्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे, किरण गोसावी आणि सॅम डिसुजा ही तीन नावे घेतली आहेत व आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली आणि त्यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा केला आहे. याबाबत एकीकडे एनसीबीने चौकशी सुरू केली असताना मुंबई पोलीसही संपूर्ण प्रकरणाचा खंडणीच्या अँगलने तपास करत आहेत. त्याच अनुषंगाने मंगळवारी प्रभाकर साईल याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. त्यानंतर साईल आज एनसीबीच्या तपासात सहभागी होईल, असे वाटत होते मात्र त्याने पाठ फिरवली. त्याबाबत माध्यमांनी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे विचारणा केली. प्रभाकर साईल मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी पोहचू शकतो तर एनसीबीला त्याचा जबाब का मिळू शकत नाही, असे विचारले असता, आम्ही प्रभाकर साईल आणि किरण गोसावी या दोन्ही पंच साक्षीदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे उपलब्ध पत्ते आहेत त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यात एकाचं घर बंद आढळलं तर दुसऱ्याचा पत्ता व्हेरिफाय होऊ शकला नाही. एकाच्या वकिलाशीही आम्ही संपर्क साधला आहे. त्यांच्यामार्फत संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नमूद करताना जर तुमच्यापैकी कुणाचं यांच्याशी बोलणं झालं तर तुम्हीसुद्धा त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज पोहचवू शकता, असे सिंह म्हणाले. वाचा: प्रभाकर साईल आणि किरण गोसावी जे माध्यमात बोलत आहेत ते त्यांनी आमच्यासमोर येऊन सांगावं. आमची टीम दोन दिवस मुंबईत आहे. उद्या किंवा परवा कोणत्याही दिवशी शक्यतो सकाळच्या सत्रात टीमसमक्ष त्यांनी हजर व्हावं व कोणत्याही दबावाखाली न येता आपलं म्हणणं मांडावं. तपासात पूर्ण निष्पक्षता आणि पारदर्शकता राहावी याच उद्देशाने एनसीबी कार्यालयाऐवजी आम्ही वांद्रे सीआरपीएफ मेस येथे हा तपास करत आहोत. तिथे या दोघांनी यावं, असे सिंह यांनी नमूद केले. मुंबई पोलीसही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत, तुम्ही त्यांचं सहकार्य घेणार आहात का, असे विचारले असता मुंबई पोलीस ही एक जबाबदार तपास यंत्रणा आहे. ते तपास करत असतील तर मी त्यावर काही टिपण्णी करणार नाही. या चौकशीत साईल यांनी साक्ष म्हणून सहभागी व्हावे इतकेच माझे म्हणणे आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले. प्रभाकर साईलला धमकावले जात आहे. त्याच्यावर दबाव आहे. त्याला आमिष दाखवले जात आहे, असे वाटते का, असे विचारले असता मला यावर काहीच बोलायचे नाही, असे सिंह यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: