mahadik vs patil: सतेज पाटील यांच्यावर अमल महाडिकांचा हल्लाबोल; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने

October 26, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून राजकीय फायदा उचलण्याचे तंत्र चांगले आहे. पहिल्यांदा अडथळा निर्माण करायचा, नंतर ते आपण सोडविल्याचे नाटक करायचे, ही भूमिका पालकमंत्र्यांनी चांगली वठविली असा टोला माजी आमदार यांनी लगावला आहे. (former mla amal patil criticizes minister ) लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या कारखान्यावर सध्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. गोकुळ नंतर हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाडिक व पाटील पुन्हा आमने सामने आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाडिक यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या कसबा बावडा येथील छ.राजाराम बंधारा हा दुरूस्तीकरीता २५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर अखेर वाहतूकीकरीता बंद ठेवण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता यांनी घेतल्याचे वर्तमानपत्रातून समजले. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामास सुरूवात झाल्यानंतरच बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा निर्णय का घेतला गेला असावा ? कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्वच बंधारे सुस्थितीत आहेत का ? त्यांची यादी त्यांनी का जाहीर केली नाही ? की फक्त निवडणूकीच्या तोंडावर ऊस वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होवून कारखाना प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ करण्याचा यामागे काही हेतू होता ? असे बरेचसे प्रश्न या निर्णयानंतर उपस्थित झाले. पण आम्ही त्यावर कसलीही टिका टिप्पणी केली नाही. उलट राजाराम साखर कारखान्याच्या वतीने मा.कार्यकारी संचालकांनी त्याच दिवशी (२३ ऑक्टोबर २०२१)‘सदरचा निर्णय रद्द करून गळीत हंगाम संपल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घ्यावे’, अशा आशयाचे विनंती पत्र .जिल्हाधिकारी, मा.कार्यकारी अभियंता व मा.प्रादेशिक सहसंचालक यांना दिले होते. क्लिक करा आणि वाचा- श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कार्यतत्परतेमुळे, शेतकऱ्यांचा रोष व्यवस्थापनावर न जाता उलट आपल्यावरच येईल या भितीने पालकमंत्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी (२४ ऑक्टोबर २०२१) पाटबंधारे विभागाला निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले. आणि लगेच वर्तमानपत्र, मिडियाच्या माध्यमातून आपणच शेतकऱ्यांचा तारणहार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. आधी मुद्दाम कारखान्यासमोर आणि शेतकऱ्यासमोर अडचण निर्माण करायची व नंतर कारखान्याला त्या अडचणीतून बाहेर काढल्याचं नाटक पालकमंत्री यांनी अतिशय उत्कृष्ठपणे वठविले, त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक ! पण कारखान. म्हणजे सर्वसामान्य सभासद शेतकरी अडचणीत यावा म्हणून याआधीही गाडी अड्डयाच्या जागेवर आरक्षण टाकणे, विधानसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांकरवी कारखान्यावर दगडफेक करणे, वारंवार विस्तारीकरणास विरोध करून प्रगतीला खोडा घालणे असे उद्योग पालकमंत्री व त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेले असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग मात्र सपशेल फसला असा टोलाही या पत्रकात मारण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- कसलेही लोकहिताचे काम न करता केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळयात धुळफेक करून राजकीय फायदा उचलण्याचे तंत्र या व्यक्तीला अवगत असले तरी इथून पुढच्या काळात आम्ही सातत्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडत राहू व कलंकीत राजकारणाला फाटा देवून त्यांचा प्रत्येक कुटील डाव निश्चितपणे हाणून पाडू असेही या पत्रकात म्हटले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: