Khadse-Mahajan Dispute: खडसे-महाजन वाद; जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल वांध्यात
म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी त्यार केले जाणारे सर्वपक्षीय पॅनल आता वांध्यात सापडले आहे. बिनविरोध पार पडण्याची शक्यता असलेली बँकेची निवडणुक महाजन-खडसे वादामुळे आता चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (the khadse mahajan dispute has hampered the all-party panel in the district bank elections) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये समन्वय साधून, ही निवडणूक गेल्या वर्षाप्रमाणेच बिनविरोध करण्याची तयारी सुरु केली आहे. या तयारीच्या चर्चेसाठी सर्वपक्षीय नेत्यांचा दोन बैठका देखील पार पडल्या आहेत. तसेच सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वपक्षीय नेत्यांची कोअर कमेटीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खडसे-महाजन यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. महाजन व खडसे ऐकमेकांवर वैयक्तिक आरोप करीत असल्याने आता बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलची शक्यता धुसर झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- खडसे-महाजन यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आधीच भाजपने सर्वपक्षीय पॅनलमध्ये खडसेंचा नावाला विरोध केला होता. पदाधिकाऱ्यांचा सूचनेनंतर भाजपने जिल्हा बँकेसाठी संभाव्य उमेदवारांची यादी देखील निश्चित केली आहे. दूसरीकडे महाविकास आघाडीने देखील भाजपच्या स्वबळाच्या हालचाली पाहता आघाडीतील घटक पक्षांना घेवून, स्वतंत्र पॅनलची तयारी देखील सुरु केली आहे. भाजपनंतर महाविकास आघाडीने देखील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चाचपणी सुरु केली आहे. क्लिक करा आणि वाचा- सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून आता खडसे- महाजन एकत्र येणे अवघड असले तरी शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील व कीशोर पाटील यांनी बँकेत सर्वपक्षीय पॅनल असावे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. या नेत्यांना अजूनही खडसे- महाजन यांच्यात निदान जिल्हा बँक निवडणुकीसाठी समेट होण्याची आशा आहे. त्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याचे समजते. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: