काहीही करून पुन्हा पिंपरी-चिंचवड काबिज करायचे! आता शरद पवार उतरले मैदानात…

October 02, 2021 , 0 Comments

पिंपरी चिंचवड । सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. मोठ्या प्रमाणावर विकास करून देखील गेल्या निवडणूकीत ही महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून गेली आणि भाजपची सत्ता आली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि पवारांचा बालेकिल्ला ओळखला जातो. आता भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रिंगणात उतरले आहेत. शरद पवार माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत, तर १६ ऑक्टोबरला पवारांच्या उपस्थित मेळावा होणार आहे.

यामुळे या निवडणुकीत यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्यात देखील राष्ट्रवादीचे सरकार आहे, यामुळे भाजपसमोर मोठ आव्हान निर्माण झाले आहे. अनेक भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यासाठी तयार देखील आहेत.

पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका एक मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका ही आहे. अनेक मोठ्या कंपन्या याठिकाणी आहेत. जगातील तरुण येथे येत असतात. पवार कुटूंबाचे या शहराच्या विकासात मोठे योगदान आहे.

असे असताना २०१७ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता गेल्याने अजित पवारांच्या हे जिव्हारी लागले होते. मात्र राष्ट्रवादीतल्या काही फुटीर नेत्यांमुळेच भाजपला सत्ता मिळवणे सोपे झाले होते. आता मात्र राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे.

अजित पवार आता येथे लक्ष देऊन आहेत, यामुळे येणाऱ्या काळात अनेकजण भाजपचे नगरसेवक देखील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. याबाबत अजित पवार यांनी सूचक वक्तव्य देखील केले होते. असे असले तरी भाजपकडूनन देखील तयारी सुरू आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: