मस्तक टेकवून माफी मागते! बिग बॉसमध्ये गेल्याने कीर्तनकार शिवलीला यांनी मागितली माफी

October 12, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून कीर्तनकार शिवलीला पाटील चर्चेत आहेत. त्या बिग बॉस मध्ये गेल्याने वारकरी संप्रदाय नाराज झाला होता. अखेर त्यांनी आता माफी मागितली आहे. यामुळे त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

त्या म्हणाल्या, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही, असे म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.

बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निर्णयाने वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी त्यांना दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते. माझे विचार पोहचवण्यासाठी मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी माझा हेतू मात्र प्रामाणिक होता

राज्यभर महिला कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र शिवलीला पाटील या बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येत होते. यामुळे त्या काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पंढरपूर येथे त्या विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. तेथील वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने माझी तब्येत बिघडली. मी चार दिवस हॉस्पिटलमध्ये अँडमिट होते. यानंतर विचार करून मी तब्येतीच्या कारणाने बिग बॉस च्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे शिवलीलाने सांगितले.

आता वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाणार नसल्याचे शिवलीला पाटील यांनी सांगितले. यामुळे आता वारकरी संप्रदाय तिला माफ करणार की हा संघर्ष सुरूच राहणार हे लवकरच समजेल.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: