मुंबई: वन अविघ्न पार्क बिल्डरवर गुन्हा दाखल; आग दुर्घटनेवर पालिका कठोर
मुंबई: येथील ६१ मजली टॉवरला आग लागल्यानंतर अग्निशमन दल अवघ्या दहा ते बारा मिनिटांत घटनास्थळी पोहचले. याठिकाणी अग्निशमन दलाच्या ४० गाड्या व २०० कर्मचारी कार्यरत होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले, असे नमूद करतानाच या घटनेप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महापौर यांनी सांगितले. दरम्यान, वन अविघ्न पार्क टॉवरला लागलेल्या आगीत १९ व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला तर २६ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. ( Update ) वाचा: मुंबईतील अवैध बांधकामे तसेच आगीच्या घटनांबाबत महापौरांनी आज परिमंडळ निहाय उपायुक्तांची बैठक भायखळा येथील महापौर निवासस्थानी घेतली. या बैठकीला उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, (परिमंडळ २), हर्षद काळे (परिमंडळ ३), पराग मसुरकर (परिमंडळ -५), विश्वास शंकरवार, (अतिक्रमण निर्मूलन ) संजोग कबरे तसेच प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब उपस्थित होते. वाचा: स्पिंकलर पद्धतीमुळे घरातील आगींवर आपण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवित असलो तरी उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्पिंकलरसोबतच अन्य साधनांचा समावेश करण्याबाबत अग्निशमन दलाने काटेकोर नियोजन व तयारी करावी, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेवरून उंच इमारती व त्याची अग्नी सुरक्षितता याबाबत धोरण निश्चित करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ज्या विभागातील अतिक्रमणांबाबत तक्रार प्राप्त झाली आहे, त्या संबंधित ठिकाणी संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तातडीने कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच पदनिर्देशित अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. तक्रारी प्राप्त झालेल्या संबंधित विभागांना लवकरच भेटी देणार असल्याचे महापौर म्हणाल्या. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: