डॉक्टरचा खून, श्वानपथकामुळे पकडला गेला आरोपी आणि आता...

October 28, 2021 0 Comments

अहमदनगर : आरोपीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांकडून श्वान पथकाचा वापर केला जातो. अनेकदा त्याला यश येतेच असे नाही. तालुक्यातील एका घटनेत मात्र पोलिसांच्या श्वानाने काही वेळातच आरोपी पकडून दिला. विशेष म्हणजे त्या आधारे पोलिसांनी जमा केलेल्या साक्ष व पुरावे न्यायालयातही ग्राह्य धरले गेले आणि खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप ठोठावण्यात आली. ( ) वाचा: श्रीगोंदा तालुक्यातील या गावात ४ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती. त्याचा निकाल आता लागला आहे. यांचा खून झाला होता. यामध्ये न्यायालयाने आरोपी (वय ५२, रा. कौठा) याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. जिल्हा न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी सरकारतर्फे बाजू मांडली होती. या खटल्यात साक्ष व पुरावे जसे महत्त्वाचे ठरले, तशी आरोपी पकडून देण्याची पोलिसांच्या श्वानाची कामगिरीही महत्त्वाची ठरली आहे. वाचा: डॉ. विपुल डे कौठा येथे राहत होते. वैद्यकीय व्यावसायासोबत ते पशुपालनही करीत होते. त्यासाठी त्यांनी कंत्राटी पद्धतीने शेत घेऊन तेथे जनावरांच्या चाऱ्याचे पीक घेतले होते. त्यांची ही शेती आरोपी थोरात याच्या शेताशेजारी आहे. घटनेच्या दिवशी थोरात सायंकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. रात्रीचे नऊ वाजले तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधशोध केली. रात्रभर तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी डे यांचा मृतदेह थोरात याच्या शेताजवळ आढळून आला. याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस आले, श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले. श्वानाने घटनास्थळावरून माग काढत थेट थोरात याचे घर गाठले आणि थोरात हा आरोपी असल्याकडे पोलिसांचे लक्ष वेधले. हे पाहून आरोपी थोरात याचेही अवसान गळाले. त्याने पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. खूनाच्यावेळी घातलेले आणि घरातच लपवून ठेवलेले कपडेही आरोपीने काढून दिले. डॉ. डे यांचे पत्नीशी संबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याची कबुलीही आरोपीने पोलिसांकडे दिली. डे यांचा खून ज्या दगडाने केला, तोही दाखवून दिला. वाचा: यावर डॉ. डे यांच्या पत्नी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुद्देमाल जप्त केला, त्याच्याविरुद्ध सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र ठेवण्यात आले. न्यायालयात सरकारतर्फे आठ साक्षीदारांची साक्ष झाली. त्यातून गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: