नवरात्रीत महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीची 'महिषासुरी' चाल; भाजपचा हल्लाबोल

October 11, 2021 0 Comments

मुंबई: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर () भारतीय जनता पक्षानं कडाडून टीका केली आहे. 'नवरात्री उत्सवाच्या काळात करणे ही तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल आहे,' अशी टीका भाजपनं केली आहे. वाचा: भाजपचे आमदार अॅड. (Ashish Shelar) यांनी ट्वीट करून महाआघाडीच्या बंदच्या भूमिकेवर आसूड ओढले आहेत. 'ज्यांनी मुंबईला बंद करून आपलं दुकान चालवलं त्या तथाकथित 'बंदसम्राटांचा' इतिहास आज पुन्हा आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठिंबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करून कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढंच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचं काम बंद करून मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध... नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक आहेत,' अशी टीका शेलार यांनी तिन्ही पक्षांवर केली आहे. वाचा: 'बंद आणि विरोध हाच यांचा 'धंदा' आहे. त्यावरच यांचा 'चंदा' गोळा होतो. हे 'बंद' आता बंदच केले पाहिजेत. आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणं ही तर तिघाडीतील तीन पक्षांची 'महिषासुरी' चाल आहे,' असा आरोप करतानाच, 'आई दुर्गामाते, या महिषासुरांचा बंदचा हा खेळ उधळून टाकण्यासाठी जनतेला बळ दे,' असं साकडं शेलार यांनी घातलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: