भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिली, पण मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. भाजपने राष्ट्रवाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावं म्हणून मला १०० कोटींची ऑफर दिली होती, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर असलेल्या निष्ठेवरही भाष्य केले आहे. त्यांना माहित आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ते साताऱ्याच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
भाजपचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला वाटतं तेव्हा १०० कोटी घेतले असते तर बरं झालं, पण त्यांना माहित आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
भाजपला ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं परवानगी द्या, त्यांचा एकदाचा तोतरेपणा बाहेर काढतो, पण अजित पवार मला नको म्हणाले, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाल पण घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही, असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी ईडी आणि आयकर विभागावरही निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी गंभीर आजाराने त्रस्त आहे, माझे स्तन छोटे आहे आणि पार्श्वभाग रुंद आहे; इलियाना डिक्रूझचा खुलासा
तृप्ती देसाईची बिगबॉसमधून हकालपट्टी होणार? महिलेसोबत केलेले ‘ते’ घाणरडे कृत्य भोवणार
“चांगलाच संकटात सापडला”; ड्रग्स प्रकरणात आर्यनच्या अटकेवर प्रकाश झा यांची प्रतिक्रिया
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: